शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

Vidhan Sabha 2019: मतदारनोंदणीची प्रक्रिया ४ ऑक्टोबरपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 03:47 IST

राज्यातील मतदारनोंदणीची प्रक्रिया निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत म्हणजे ४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

मुंबई : राज्यातील मतदारनोंदणीची प्रक्रिया निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत म्हणजे ४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी नोंदणी करणाऱ्यांना निवडणुकीत मतदान करता येईल, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज पत्रपरिषदेत सांगितले.आचारसंहिता भंगाची प्रकरणे रोखण्यासाठी सी-व्हिजील अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. आचारसंहिता भंग होत असल्याचे दिसून आल्यास दक्ष नागरिक त्याचे छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून त्याची तक्रार नोंदवू शकतात, असेही बलदेवसिंह यांनी सांगितले.२०११च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांच्या मागे ९२५ महिला असे प्रमाण होते. तर २०१४ मध्ये एक हजार पुरुषांच्या मागे ८८९ महिला असे प्रमाण होते. आता २०१९मध्ये महिलांच्या संख्येत वाढ झाली असून एक हजार पुरुषांच्या मागे ९१४ असे प्रमाण आहे. दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा म्हणून यंदा सुलभ निवडणुका हे घोषवाक्य जाहीर केले आहे. दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर आणली आहेत.टोल फ्री क्रमांकमतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी व तक्रारींसाठी १९५० हा चोवीस तास कार्यरत टोल फ्री क्रमांक आहे. ३१ आॅगस्टपर्यंत महाराष्ट्रात ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदार आहेत. २०१४ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये ५९ लाख १७ हजार ९०१ इतकी वाढ झाली आहे. २०१४ साली ९०.४३ टक्के मतदारांकडे व्होटर आयडी होते. हे प्रमाण २०१९ मध्ये ९६.८१ टक्के इतके झाले.सर्व विधानसभा मतदारसघांमध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅटचा वापर संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच होणार आहे. निवडणुकीसाठी ६ लाख ५० हजार कर्मचारी नियुक्त केले आहेत.बँकेच्या व्यवहारांवर लक्षनिवडणुकीच्या काळात बेकायदा मद्याची वाहतूक व विक्री व मतदारांना इतर प्रलोभने दाखवली जाणार नाही याकडे लक्ष ठेवण्यात येईल. त्याशिवाय इन्कम टँक्स, एक्साईज विभागाची दक्षता पथके नेमण्यात आली आहेत. त्याशिवाय बँकांमधून होणा-या मोठ्या रक्कमांच्या व्यवहारावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019