शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Vidhan Sabha 2019: भाजपच्या बहुतेक सर्व मंत्र्यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 06:42 IST

राज्यमंत्री रणजीत पाटील अकोटमधून; तर प्रवीण पोटे तिवसामधून लढणार

- यदु जोशीमुंबई : भाजपच्या राज्यातील बहुतेक मंत्र्यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाणार आहे. एखादे नाव अपवादानेच वगळले जाण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतून लढतील वगैरे चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. ते दक्षिण-पश्चिम नागपूरमधूनच लढतील. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर), उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे (बोरीवली), ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (परळी), जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (जामनेर), पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर (परतूर), सहकार मंत्री सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण), गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (कामठी; नागपूर), पर्यटन मंत्री जयकुमार रावल (शिंदखेडा), अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर (निलंगा), कामगार मंत्री डॉ.संजय कुटे (जळगाव जामोद), शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार (वांद्रे; मुंबई), कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे (वरुड-मोर्शी), सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे (मिरज), आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके (राळेगाव), राज्यमंत्री मदन येरावार (यवतमाळ), विजय देशमुख (सोलापूर उत्तर), रवींद्र चव्हाण (डोंबिवली), राज्यमंत्री बाळा भेगडे (मावळ), राज्यमंत्री अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरतील. राज्यमंत्री विद्या ठाकूर (गोरेगाव) यांच्याशिवाय अन्य पर्यायांवरही पक्ष विचार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना पुन्हा संधी मिळू शकते. पण त्या बाबत अंतिम निर्णय झालेला नाही.गृह राज्यमंत्री रणजित पाटील विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांना अकोट मतदारसंघातून रिंगणात उतरविण्याचा विचार सुरू आहे. त्यांनी स्वत:ही लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तीन महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेले माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघात संधी दिली जावू शकते पण ते स्वत: लढण्यास इच्छुक नसल्याचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री व पक्षाला दिल्याची चर्चा आहे. तरीही पक्ष त्यांच्यासाठी आग्रही आहे. माजी राज्यमंत्री अंबरिशराजे आत्राम (अहेरी, जि.गडचिरोली) यांना पुन्हा संधी देण्याबाबत साशंकता आहे.चंद्रकांत पाटील लढणार नाहीतभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभेची निवडणूक लढणार अशी चर्चा असली तरी तशी शक्यता दिसत नाही. पाटील यांच्यावर पश्चिम महाराष्ट्रातील ५६ जागांव्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्याची जबाबदारी असल्याने त्यांना पक्ष एका विधानसभा मतदारसंघात अडकवून ठेवण्याची शक्यता कमी आहे. त्या बाबतचा निर्णय त्यांनी पक्ष नेतृत्वावर सोडला आहे.माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना विक्रमगडमधून (जि.पालघर) पुन्हा संधी दिली जाणार नाही. ते त्यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे म्हटले जाते. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (मुक्ताईनगर), सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले (अर्जुनी मोरगाव) यांना पुन्हा संधी मिळू शकते.युतीमध्ये वाट्याला येणाऱ्या जागांपैकी जास्तीतजास्त जागा निवडून आणण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच पक्षाचे प्रस्थापित नेते, मंत्री यांच्यापैकी कोणाला संधी नाकारण्याच्या मन:स्थितीत पक्षदिसत नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा