शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: वंचित बहुजन आघाडी देणार २५ मुस्लीम उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 05:29 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - २५ जागांवर मुस्लीम उमेदवार देणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी किमान २५ जागांवर मुस्लीम उमेदवार देणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. एमआयएमसोबत आघाडीचे दरवाजे अद्याप खुले असल्याचे सांगतानाच आप आणि डाव्या पक्षांशीही चर्चा सुरू असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष लोकसभेपूर्वी एकत्र आले होते. राज्यातील काही मतदारसंघांत या आघाडीच्या उमेदवारांनी चमकदार कामगिरीही केली. विधानसभेतील जागावाटपाच्या मुद्द्यावरून एमआयएमने वंचितचा पाठिंबा काढून घेतला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आज प्रकाश आंबेडकर यांनी किमान २५ जागांवर मुस्लीम उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे आॅल इंडिया उलेमा बोर्डानेही आज वंचित बहुजन आघाडीला सशर्त पाठिंबा जाहीर केला. वंचितची सत्ता आल्यास मुस्लिमांना शिक्षणात दहा टक्के आरक्षण, वक्फ बोर्डाच्या अतिक्रमित जमिनी बोर्डाला परत करणे, मॉब लिंचिंगविरोधात कठोर कायदा बनविण्याचे आश्वासन दिल्यानंतर उलेमा बोर्डाने वंचितला आपला पाठिंबा जाहीर केला. उलेमा बोर्डाशी चर्चा करूनच २५ मुस्लीम उमेदवारांची नावे नक्की करणार असल्याचेही आंबेडकर यांनी या वेळी स्पष्ट केले.एमआयएमसोबतच्या आघाडीबाबत विचारले असता, त्यांनी दरवाजे बंद केले आहेत. मात्र, त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडेच आहेत. धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्रितपणे निवडणूक लढवावी, हीच आमची भूमिका असल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019