शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Vidhan Sabha 2019 : आमच्याकडे पूर्वी खतावणी करणारे लोक होते; पवारांची फडणवीसांवर उपरोधिक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 6:38 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - पूर्वीच्या काळात आमच्या घरात खतावणी लिहिणारे असायचे, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी येथे केली़

उस्मानाबाद : मुख्यमंत्री म्हणत आहेत, मी पाच वर्षांतील कामांचा हिशेब द्यायला निघालोय. हिशेब लिहिणे चांगलीच गोष्ट आहे... पूर्वीच्या काळात आमच्या घरात खतावणी लिहिणारे असायचे, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी येथे केली़माजी मंत्री डॉ़ पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला़ त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची घडी पुन्हा बसविण्यासाठी शरद पवार यांनी उस्मानाबादमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी बोलताना पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षांतर केलेल्या नेत्यांवर सडकून टीका केली.मुख्यमंत्री हिशेब लिहून झाल्यावर तो जनतेला सांगायचे सोडून ९० टक्के भाषण माझ्यावरच करतात़ पवारांनी काय केले ते सांगा म्हणतात़ यंदा राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली़ बेरोजगारी वाढली, अनेकांच्या नोकºया गेल्या; याचा हिशेब कोण देणार, असा सवाल पवार यांनी केला. मी आताच्या नेत्यांसारखे पक्षांतर कधी केले नाही़ उलट मी स्वत: नवीनपक्ष काढले. पक्षांतर करणाऱ्यांनी किमान एवढे तरी करून दाखवायचे होते़ विकासासाठी नव्हे तर ईडी आणि सेबीच्या भीतीने ते लोक पळत आहेत. ४० वर्षांपेक्षा जास्त काळ ज्यांना सत्तेत बसविले त्यांना आपल्या भागाचा विकास करून घेता आला नाही़ त्यांना आम्ही सन्मान दिला़ पहिल्या रांगेत बसविले़ आता ते अशा ठिकाणी गेलेत जिथे बस म्हटले की बसावे लागते़ स्वत:ला सिंह म्हणवून घेणारे देखील शहांच्या दर्शनाला गेले, असा टोला त्यांनी राणाजगजितसिंह यांना लगावला.।राष्टÑवादीच्या सभेत मनसेचे गाणे!सोलापूर येथेही शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी कार्यक्रमस्थळी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आधारित ‘तुमच्या राजाला साथ द्या हे ’ हे गाणे लावण्यात आले होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019