शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: मनसे 'सेन्चुरी'साठी तयार; राज ठाकरेंचं 'इंजिन' विधानसभा निवडणुकीत स्वबळावर धावणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 14:33 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतचा संभ्रम अखेर दूर झाला आहे.

मुंबई - राज ठाकरेंच्यामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतचा संभ्रम अखेर दूर झाला आहे. मनसे विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसे सुमारे 100 जागांवर निवडणूक लढवणार असून, त्यासाठी राज ठाकरे यांनी उमेदवारांची यादी मागवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर विधानसभेच्या मोजक्या जागा लढवण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे असे मनसेचे प्रभावक्षेत्र असलेल्या विभागातून मनसे 100 जागांवर उमेदवार देणार आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी इच्छुक उमेदवारांची यादी मागवली आहे.  लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या भाषणाचा प्रभाव दिसून आला होता. मात्र लोकसभेच्या निकालांनंतर मनसेच्या गोटात तशी शांतताच होता. त्यातच मनसे यंदा विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे वृत्त पसरल्याने मनसैनिकांच्या गोटात निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पक्षाने संपूर्ण राज्यात निवडणूक न लढवता प्रभावक्षेत्र असलेल्या भागात निवडणूक लढवावी, अशी मागणी मनसैनिक आणि नेत्यांकडून करण्यात येत होती. गेल्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारात राज ठाकरे यांचा बोलबाला राहिल्याचे दिसून आले होते. अर्थात त्यांच्या ‘मनसे’चे उमेदवार रिंगणात नव्हते, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधाची भूमिका असली तरी, कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला मते द्या, असेही त्यांनी स्पष्ट सांगितलेले नव्हते; त्यामुळे प्रचारात गाजूनही मतांचा लाभ विरोधकांना होऊ शकला नव्हता. विधानसभा निवडणुकीत ‘मनसे’ फॅक्टर काही ठिकाणी महत्त्वाचा ठरण्याची अटकळ तेव्हापासूनच बांधण्यात येत आहे; पण काळ पुढे निघून चालला तरी त्याबाबतचा निर्णय या पक्षात होताना दिसत नाही. दोनच दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीतही ठोस निर्णय होऊ शकलेला नव्हता.  

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Maharashtraमहाराष्ट्र