शहरं
Join us  
Trending Stories
1
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
3
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
4
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
5
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
6
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
7
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
8
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
9
Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
10
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
11
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
12
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
13
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
14
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
15
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
16
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
17
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
18
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
19
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
20
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...

Vidhan Sabha 2019 : जिकडे तिकडे व्हॅकन्सी मोरूची चुकली फ्रिक्वेंसी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 04:31 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - थंडगार पाण्याचा तांब्या डोक्यावर ओतताच मोरूच्या अंगातून शिराशिरी बाहेर पडली.

- सुधीर महाजनथंडगार पाण्याचा तांब्या डोक्यावर ओतताच मोरूच्या अंगातून शिराशिरी बाहेर पडली. आपल्या ईडा-पिंगळा जागृत झाल्याचे हे लक्षण समजून त्याच्यात अन्तर्बाह्य उत्साहाचा लोट उसळून आला. भडाभडा पाणी अंगावर ओतून तो ओल्या कपड्यानिशी देवघरात पाटावर येऊन बसला. उदबत्ती पेटवताच धूम्रवल्यासह सुगंधाने वातावरण व्यापले आणि मोरूने नासिकाग्रावर नजर स्थिर करीत डोळे मिटले. सभोवताली प्रचंड शांतता सुस्त होऊन पडली होती. पहाटेचे पावणेचार वाजलेले. घरातही सगळेच साखरझोपेत त्यामुळे मोरूची चाहूल कोणाला येणे शक्यच नव्हते.तासाभराने दुधाची रिक्षा दुकानासमोर थांबल्याचा नित्याचा आवाज आला रस्त्याने छोट्या वाहनांची, फिरायला जाणाऱ्यांची तुरळक वाहतूक सुरू झाली. सहाच्या ठोक्याला नमाजच्या आवाजाने आसमंत व्यापले. ते सरते न सरते तोच मंदिरात भीमसेनांचा रियाज सुरू झाला. पाठोपाठ बुद्धवंदनेने उरलेल्यांना जागे केले. मोरूची बायको बालीला जाग आली. पलंगावर मोरू नसल्याचे तिच्या लक्षात आले; पण असेल घरात किंवा अधून मधून येणारा ‘मॉर्निंग वॉक’चा ‘अटॅक’ आला असावा, असे समजून ती स्वयंपाकघराकडे वळली तो पर्यंत रस्त्यावरची वर्दळ वाढली होती. मोरू त्राटक लावून बसलेलाच; पण मन एकाग्र होत नव्हते. दोन तास उलटूनही त्याला काही गवसत नव्हते. हळूहळू तो अस्वस्थ झाला आकलुजच्या ‘शिवरत्न’ बंगल्यातून निघालेल्या ध्वनिलहरींनी अख्खा महाराष्ट्र व्यापला होता. या ध्वनी कंपनांनी लोणीतला राधाकृष्ण विखेच्या वाड्याला वेढा दिला, अकोल्यात पिचडांच्या बंगल्याचा अँटिना काबीज केला. नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर आणि बापूसाहेब गोरठेकरांनाही कवेत घेतले. नंदुरबारमध्ये भरत गावितांच्या ‘सुमाणिक’ बंगल्याला वेटोळा घातला. उस्मानाबादेत राणांच्या गढीला कवेत घेत या लहरी साताºयात छत्रपतींच्या जलमहालातून निघून थेट शिवेंद्रच्या ‘सुरुचि’पर्यंत पोहोचल्या. धनंजय महाडिकांच्या वास्तूला स्पर्श करीत फलटणच्या राजवाड्यावर धडका मारू लागल्या, अशा ‘नेटवर्कने’ ध्वनिलहरींनी महाराष्ट्र काबीज केला.या लहरी नेमक्या काय होत्या हे मोरूला कळत, उमजत नव्हते. उलगडा होत नव्हता. परवा तो भगवा सदरा घालून कलानगरात गेला त्यावेळी भास्कर जाधवांच्या सोबतच्या लोंढ्यात तो सरळ ‘मातोश्री’तच आपसूक पोहोचला. तिथले मंतरलेले वातावरण पाहून भारावून गेला आणि आतून काहीतरी उचंबळून येत आहे, धडका मारत आहेत याची जाणीव त्याला झाली. मंत्रवत त्याने हात पुढे करताच त्याच्याही हातावर शिवबंधन बांधले गेले आणि अंगात वीज संचारल्याचा भास झाला. तशा भारावलेल्या अवस्थेत तो घरी पोहोचला; पण मनाला स्वस्थता नव्हती. काही तरी आहे पण ते सापडत नाही. अशी लंबक अवस्था झाली होती. मध्यरात्रीनंतर अंथरुणात तळमळत असताना भास्कर जाधवांचा खोलवर दडलेला आवाज त्याच्या कानावर आला. ‘अंतरात्म्याचा आवाज’ असे काही शब्द होते. मोरू लगेच उठला आणि त्राटक लावून कानात प्राण आणून बसला; पण अंतरात्म्याचा आवाज येत नव्हता. महाराष्ट्राच्या घराघरातला आवाज आपल्याला ऐकू येत नाही म्हणून त्याची बेचैनी वाढत होती. तिकडे घरात मोरूच्या बापाने रेडिओ लावला; पण बातम्यांचा आवाज नीट येत नव्हता. स्वयंपाकघरातून चहाचा कप आणत बाली म्हणाली बाबा फ्रिक्वेंसी अ‍ॅडजस्ट करा. अन् मोरू ताडकन उठला आणि बाहेर पळाला फ्रिक्वेंसीच्या शोधात.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Madhukar Pichadमधुकर पिचडRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील