शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: मी मरेपर्यंत 'या' शहराला विसरु शकणार नाही, अजितदादांचे भावनिक आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 12:18 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - रविवारी पिंपरीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेताना अजित पवार म्हणाले की, आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

पिंपरी - पिंपरी-चिंचवडमध्ये आमच्यासोबत जोवर कार्यकर्ते आहेत, तोवर कुणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही! मी मरेपर्यंत या शहराला विसरू शकणार नाही. मी खात्री देतो. यावेळेस राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून द्या. सहा महिन्यात शास्ती कर माफ केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही असं सांगत अजित पवारांनी लोकांना भावनिक आवाहन केलं आहे. 

रविवारी पिंपरीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेताना अजित पवार म्हणाले की, आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. वंचित बहुजनसोबत आघाडी करण्याची आमची इच्छा आहे. पुण्यात एकूण 8 विधानसभेच्या जागा आहे. त्यातील राष्ट्रवादी 4, काँग्रेस 3 आणि 1 जागा मित्रपक्षाला सोडली जाईल असं त्यांनी सांगितले. तसेच इच्छुकांची संख्या जास्त असल्याने मर्यादित लोकांनाच तिकीट देऊ शकतो असं अजित पवारांनी सांगितले. 

तसेच पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर तोंडसुख घेत अजित पवार म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून काही नेते भाजपात प्रवेश करत आहेत. त्यांनी केलेले घोटाळे बाहेर येऊ नये यासाठी सर्वांनी पक्षांतर केले असा आरोप अजितदादांनी केला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही भावनिक ट्विट केलं होतं. थकलो आहे जरी, मी अजून झुकलो नाही, जिंकलो नसलो तरी अजून मी हरलो नाही. अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना हाक दिली होती. पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्ष सोडून भाजपा,शिवसेनेत प्रवेश करत आहे. 

पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसला बालेकिल्ला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आणि महापालिकेवर सत्ता होती. मात्र कालांतराने भाजपाने अजित पवारांचा हा गड काबीज केला. लक्ष्मण जगताप, महेश लांडगे असे अनेक अजित पवारांचे विश्वासू सहकारी भाजपाच्या जवळ गेले. त्यामुळे अजित दादांची शहरावरची पकड ढिली झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हा गड पुन्हा कब्जा करण्यासाठी अजितदादांनी कंबर कसली आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा