शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

Vidhan Sabha 2019: मुख्यमंत्र्यांच्या 'खास' माणसाला औसातून उमेदवारी; काँग्रेसवर पडणार का भारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 14:52 IST

शिवसेनेचं वर्चस्व असूनही औसा मुख्यमंत्र्यांनी औसा मतदारसंघ मागून घेतला

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं पहिली यादी जाहीर केली. यामध्ये १२५ जणांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह दिग्गजांचा समावेश आहे. मात्र या यादीत अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावं नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावांचा पहिल्या यादीत समावेश नाही. मात्र या यादीतील एका नावाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.शिवसेना-भाजपा युतीतील कळीचा मुद्दा असलेल्या लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून अभिमन्यू पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पवार मुख्यमंत्र्यांचे ओएसडी/पीए आहेत. १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेनेनं औसामध्ये बाजी मारली होती. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाला सोडण्यासाठी शिवसेना फारशी उत्सुक नव्हती. मात्र अखेर मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्यासाठी औसा मतदारसंघ मागून घेतला. शिवसेनेला दोनदा मिळालेला विजय सोडल्यास बाकीच्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं औसात वर्चस्व राखलं. सध्या काँग्रेसचे बसवराज पाटील औसाचं प्रतिनिधीत्व करतात. बसवराज पाटील यांनी २००९ मध्येही विजय मिळवला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपकडून पाशा पटेल निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र त्यांना पराभव पत्करला. त्यामुळे आता मुख्यमंत्र्याचे ओएसडी बाजी मारणार की बसवराज पाटील वर्चस्व राखणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा