शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

Vidhan Sabha 2019 : चौघांचा नकार, मात्र अफवांचा बाजार कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 4:28 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे, साक्रीचे आमदार डी.एस.अहिरे आणि शिरपुरचे आमदार काशिराम पावरा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

धुळे : मुंबईत २२ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासह जिल्हा बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे, साक्रीचे आमदार डी.एस.अहिरे आणि शिरपुरचे आमदार काशिराम पावरा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. ‘लोकमत’ ने चौघांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रवेशाचे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे.धुळे जिल्ह्यातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासह त्यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे जिल्हा बँँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे, शिरपूरचे आमदार काशिराम पावरा, साक्रीचे आमदार डी.एस.अहिरे आणि माजी जि.प.अध्यक्ष शिवाजीराव दहिते हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या दोन महिन्यापासून सुरु आहे.सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रा धुळ्यात येईल, तेव्हा हा प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र महाजनादेश यात्रेदरम्यान तसे काही घडले नाही. त्यानंतर गुरुवारी नाशिक येथे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत प्रवेश होईल, अशी चर्चा सुरु झाली. मात्र यावेळेसही प्रवेशाचा मुहूर्त टळला. आता २२ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल, अशी चर्चा गेल्या दोन दिवसापासून सोशल मिडियावर सुरु आहे. काही वृत्त वाहिन्यांनी सुद्धा अशा बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.मात्र यासंदर्भात ‘लोकमत’ने वरील चौघा नेत्यांशी मोबाईलवरुन संपर्क साधला असता त्यांनी अद्याप असा कुठलाही निर्णय झालेला नाही, असे स्पष्टपणे सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Amrishbhai Patelअमरीशभाई पटेल