शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Vidhan Parishad Election: रवी राणा कुठेत? मतदान करणार की त्याआधीच पोलीस ताब्यात घेणार; वकील नागपूर खंडपीठात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 11:28 IST

Maharashtra Vidhan Parishad Election Update: भाजपाला एकेक मत महत्वाचे आहे. राज्यसभेला राणा यांनी भाजपाला मदत केली होती. यामुळे राणा यांचे विधान परिषदेला मतदान करणे भाजपासाठी गरजेचे आहे. 

राष्ट्रवादीच्या दोन आजी-माजी मंत्र्यांना मतदानाचा हक्क उच्च न्यायालयाने नाकारला आहे. यामुळे या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून यावर काही वेळात सुनावणी होण्याची शक्यता आहे. परंतू, इकडे अपक्ष आमदार रवी राणा यांनाही अटक करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. 

दोन दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट घेऊन 18 जूनला अमरावती पोलीस रवी राणा यांच्या मुंबईतील खार येथील घरी पोहोचले होते. मात्र, राणा यांच्या घरी कुणीच नसल्याने पोलिसांना तसेच माघारी परतावे लागले होते. यामुळे रवी राणा आज मतदान करण्यासाठी विधान भवनात येणार, आलेच तर पोलीस त्यांना तिथेच अटक करणार, मतदान करू देतील की नाही याबाबत साशंकता आहे. 

यामुळे राणा यांच्या वकिलांनी नागपूरच्या खंडपीठामध्ये धाव घेतली असून मतदान करू द्यावे, अशी विनंती केली आहे. राणा यांना अटक झाली किंवा ते विधान भवनात नाही आले तरी भाजपाचे एक मत फुकट जाणार आहे. भाजपाला एकेक मत महत्वाचे आहे. राज्यसभेला राणा यांनी भाजपाला मदत केली होती. यामुळे राणा यांचे विधान परिषदेला मतदान करणे भाजपासाठी गरजेचे आहे. 

राणा यांनी काय आरोप केलेले? राजापेठ येथील उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर महापालिका आयुक्तांवर शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती आणि मुंबई पोलिसांचे एक पथक मला अटक करण्यासाठी मुंबईतील खार येथील निवासस्थानी पोहोचले, पण आपण त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने ते मला अटक करू शकले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावतंत्राचा हा एक भाग असून आपण यावर कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार आहोत, असे रवी राणा यांनी स्पष्ट केले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?गेल्या फेब्रुवारी महिन्यात अमरावती महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा हटवला होता. यामुळे संतप्त झालेल्या युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी अमरावती येथील राजापेठ येथे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकून त्यांचा निषेध केला होता. याप्रकरणी अमरावती पोलिसांनी आमदार राणांविरुद्ध कलम ३०७ आणि कलम ३५३ अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकBJPभाजपा