शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Parishad Election:'कोणी जरी पावसात भिजला तरी त्याचा परिणाम होणार नाही', गोपीचंद पडळकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 14:24 IST

Maharashtra Vidhan Parishad Election: राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांची आज निवडणूक होत आहे. दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की, भाजपच्या हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election: राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांची आज निवडणूक होत आहे. दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की, भाजपच्या हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच सत्ताधारी आणि विरोधी नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज सरकारवर जोरदार निशाणा साधला.

'कोणी कितीही पावसात भिजा...'विधान भवनाच्या आवारात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना पडळकर यांनी आजच्या मतदानावर भाष्य केले. तसेच, यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "कोणी कितीही पावसात भिजले, तरी त्याचा परिणाम होईल असं आज वाटत नाही. भारतीय जनता पक्ष लोकशाहीवर विश्वास ठेवणारा आहे. 2019ला राज्यातील जनतेने भाजप-सेना युतीचे 161 आमदार निवडून दिले होते. पण, विश्वासघात झाला. पाठीत खंजीर खुपसून यांनी सरकार स्थापन केले. पण, आता आमदारांना आपले मत व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे," अस पडळकर म्हणाले.'यांनी अपक्षांचा अपमान केला'पडळकर पुढे म्हणाले की, "गेल्यावेळी यांनी राज्यातील अपक्ष आमदारांची किती अब्रू घालवली. अपक्ष आमदारही लोकांमधू निवडून आलेले आहेत. यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. लोकांनी आमदारांना निवडून दिले, त्यांच्या मनात आपल्या आमदाराविषयी मत कलुशीत करण्याचे काम यांनी केले. त्यामुळे हे सगळे आमदार आज व्यक्त होतील. येत्या चार तासात भाऊ जाणार की, भाई जाणार, हे कळेलचं. 170 आमदार असलेली महाविकास आघाडी सकाळपर्यंत मिटींग घेत होते, हे रात्रभर जागे होते. यातूनच त्यांचा गोंधळ उडाला आहे, हे लक्षात येत आहे," असा टोलाही पडळकरांनी लगावला.

विधान परिषदेची कोणाला उमेदवारी?शिवसेनेकडून सचिन अहीर, आमशा पाडवी रिंगणात आहेत. तर भाजपाकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उपा खापरे आणि प्रसाद लाड असे पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना तिकीट दिले आहे. तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आपले नशिब आजमावत आहेत. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकBJPभाजपा