शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 11:51 IST

Maharashtra Government: विद्यार्थ्यांच्या एसटी पासबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता विद्यार्थ्यांना प्रवास पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये वितरित करणार आहे. यामुळे पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एसटी कार्यालयांमध्ये रांगा लावण्याची गरज भासणार नाही. परिणामी त्यांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. 

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ मोहीम राबविण्यात येत आहे. यापूर्वी विद्यार्थी अथवा त्यांचे पालक एसटीच्या पास केंद्रांवर जाऊन रांगेत उभे राहून पास मिळवत असत. अनेकदा गटागटाने आगार कार्यालयात जाऊन ही प्रक्रिया पार पाडली जात होती. आता मात्र शाळा आणि महाविद्यालयांनी दिलेल्या नावाच्या यादीनुसार, संबंधित विद्यार्थ्यांना पास थेट त्यांच्या शैक्षणिक संस्थेत एसटी कर्मचारी पोहोचवतील.  

वेळ वाया जाणार नाही‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ या विशेष मोहिमेला १६ जूनपासून औपचारिक सुरुवात होणार आहे. याआधी सर्व शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना सूचना दिल्या आहेत की, त्यांनी नववर्षासाठी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवावी, जेणेकरून पास वितरण सुरळीतपणे पार पाडता येईल. या योजनेमुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या शाळेतच एसटीचा पास मिळणार असून, त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

विद्यार्थिनींना मोफत पासदरम्यान, एसटीकडून विद्यार्थ्यांना प्रवास भाड्यात ६६.६६ टक्के सवलत दिली जाते. म्हणजेच विद्यार्थ्यांना केवळ ३३.३३ टक्के शुल्क भरून मासिक पास मिळतो. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना अंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना एसटी पास मोफत दिला जातो.

टॅग्स :state transportएसटीMaharashtraमहाराष्ट्रSchoolशाळाcollegeमहाविद्यालयgovernment schemeसरकारी योजना