शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला सनातनची नको, फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा हवी: मल्लिकार्जुन खर्गे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 19:06 IST

भाजप-शिवसेनेचे सरकार सनातनसारख्या कट्टरवादी संघटनांना पाठबळ देते आहे.

कोल्हापूर- भाजप-शिवसेनेचे सरकार सनातनसारख्या कट्टरवादी संघटनांना पाठबळ देते आहे. हे धोरण निषेधार्ह असून, महाराष्ट्राला सनातनची नव्हे तर फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा हवी असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात यात्रेच्या उद्घाटनीय कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना खर्गे यांनी मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. ते म्हणाले की, भारतात अनेक पंतप्रधान होऊन गेले. पण कोणत्याही पंतप्रधानांनी जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे लावण्याचे उद्योग केले नाहीत. परंतु मोदी सरकारच्या काळात देशातील वातावरण प्रचंड कलुषित केले जात आहे. आजवर कोणत्याही पंतप्रधानांनी आपला स्तर सोडला नाही. पण मोदींनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस देशामध्ये एकता कायम ठेवण्यासाठी लढाई लढते आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा केवळ निवडणूक जिंकण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी नाही. तर ही तत्त्वांची लढाई आहे.

संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात झालेल्या मेळाव्याला माजी मंत्री आ. मधुकरराव चव्हाण, ज्येष्ठ नेते कलाप्पा आवाडे, जयवंतराव आवळे, खा. कुमार केतकर, आ. शरद रणपिसे, आ. बसवराज पाटील, आ. आनंदराव पाटील, आ. डी.पी. सावंत, आ. विरेंद्र जगताप, आ. हुस्नबानो खलिफे, आ. रामहरी रूपनवर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुवा, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, महापौर शोभाताई बोंद्रे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्यासह अनेक प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रात परिवर्तन अटळ: खा. अशोक चव्हाण

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनीही यावेळी सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, भाजप-शिवसेनेने महाराष्ट्राचा अपेक्षाभंग केला आहे, फसवणूक केली आहे. म्हणून या सरकारला फडणवीस सरकार नव्हे तर फसणवीस सरकार म्हटले जाते. निवडणुकीच्या काळात दाखवलेले स्वप्न आणि आज राज्याची झालेली दुर्दशा पाहता 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?' असे विचारण्याची वेळ आली आहे. भाजप-शिवसेनेच्या सरकारविरूद्ध राज्यात प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे. २०१९ मध्ये या सरकारचे विसर्जन होणार, हे निश्चित आहे. भाजप-शिवसेनेला राज्याच चालवणे जमलेले नाही आणि ज्यांना हे जमत नाही, त्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. हे सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे. पण केलेल्या घोषणा पूर्ण करायला या सरकारकडे पैसाच शिल्लक नाही. म्हणूनच सतत दरवाढ, करवाढ करून जनतेवर नाहक आर्थिक बोजा लादला जात असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. काँग्रेसला भयमुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे. लोकांना सरकारची भीक नको तर त्यांचे हक्क हवे आहेत आणि यासाठीच पुढील निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यावेळी सांगितले. 

खोट्या घोषणांचा पर्दाफाश करणार: पृथ्वीराज चव्हाण

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या खोट्या घोषणांचा पर्दाफाश करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने मागील ४ वर्षात काय दिवे लावले? कोणती आश्वासने पूर्ण केली? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. निवडणूक प्रचारात भाजपने भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे आश्वासन दिले होते. नरेंद्र मोदी यांनी तर 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' अशी वल्गना केली होती. पण प्रत्यक्षात सर्वत्र भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. भ्रष्टाचार दडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार सातत्याने लोकविरोधी निर्णय घेतले जात आहेत. त्याचा अतिशय प्रतिकूल परिणाम होत असताना सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही. या सर्व बाबींचा जनसंघर्ष यात्रेत समाचार घेतला जाईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.फुले-शाहू-आंबेडकरांची तसबीर लावणेही देशद्रोह!- राधाकृष्ण विखे पाटील 

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या राजवटीत घरात फुले-शाहू-आंबेडकरांची तसबीर लावणेही देशद्रोह ठरल्याचा ठपका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी ठेवला. नक्षलवादाच्या नावाखाली विचारवंत आणि साहित्यिकांवर होत असलेल्या दडपशाहीच्या अनुषंगाने त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हैद्राबाद येथील कवि वरावरा राव यांच्यावरील कारवाईचा संदर्भ देताना ते म्हणाले की, त्यांच्या मुलींच्या घराची झडती घेताना पुणे पोलिसांनी त्यांना हिंदू असताना घरी देवी-देवतांऐवजी फुले-आंबेडकरांच्या तसबीरी का लावता? असा संतापजनक सवाल केला. हे सरकार फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, ही विचारधारा समाजात इतकी खोलवर रूजली आहे की, त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर येथील जनता भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे हे सरकार समूळ उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही विरोधी पक्षनेत्यांनी दिला.हे सरकार फक्त ३-४ भांडवलदारांचे: बाळासाहेब थोरात

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे हे सरकार ना शेतकऱ्यांचे आहे, ना कामगारांचे आहे, ना व्यापाऱ्यांचे आहे. तर हे फक्त मोजक्या ३-४ भांडवलदारांचे सरकार असल्याचे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आ. बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ते म्हणाले की, या सरकारने लोकांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. काँग्रेस आघाडी सरकारचे निर्णय आणि वर्तमान युती सरकारच्या निर्णयांचा तुलनात्मक उहापोह करून थोरात यांनी या देशातील जनता पुन्हा काँग्रेसलाच निवडून देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूरAshok Chavanअशोक चव्हाणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण