शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Coronavirus: राज्यात ९ हजार ३३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७६७ दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 21:54 IST

Coronavirus: नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे.

ठळक मुद्देगेल्या २४ तासांत राज्यात एकूण ९ हजार ३३६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंदयाच कालावधीत ३ हजार ३७८ रुग्ण कोरोनामुक्तमुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७६७ दिवसांवर

मुंबई: राज्यातील जनतेसाठी पुन्हा एकदा काहीसे चिंता वाढवणारे वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३ हजार ३७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५.९१ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ९ हजार ३३६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 9336 new corona cases and 123 deaths in last 24 hours) 

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत ९ हजार ३३६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १२३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ३ हजार ३७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ४८ हजार ६९३ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण १ लाख २३ हजार २२५ आहे. तर, आज ३८ मनपा क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही, असे सांगितले जात आहे.  

मुंबईकरांना काहीसा दिलासा

गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या २० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ५४८ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ७०५ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत २४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ५४४ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे ८ हजार ११४ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०८ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ७६७ दिवसांवर गेला आहे. 

दरम्यान, राज्यात एकूण ४ कोटी २५ लाख ४२ हजार ९४३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६० लाख ९८ हजार १७७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ६ लाख ३८ हजार ००४ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ४ हजार १९८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईState Governmentराज्य सरकार