शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, ७ जागांसाठी होणार मतदान, असा आहे संपूर्ण कार्यक्रम, कुणाला संधी मिळणार? उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:48 IST

Maharashtra Rajya Sabha Election : राज्यातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ७ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या ७ जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी संध्याकाळी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

तीन टप्प्यात झालेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी आटोपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष राज्यसभेच्या महाराष्ट्रातील रिक्त होणाऱ्या ७ जागांच्या निवडणुकीकडे लागले आहे. राज्यातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ७ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या ७ जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी संध्याकाळी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले, फौजिया खान, रजनी पाटील, प्रियंका चतुर्वेदी, धैर्यशिल पाटील आणि भागवत कराड या राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी समाप्त होत आहे. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

राज्यसभेतील खासदार हे राज्याच्या विधानसभेतील आमदारांकडून होणाऱ्या मतदानामधून निवडून दिले जातात. महाराष्ट्राच्या विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार सत्ताधारी महायुतीचे ६ तर विरोधी पक्षांमधील महायुतीचा एक खासदार निवडून येऊ शकतो. अशा स्थितीत ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? महायुतीकडून कुणाला संधी दिली जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

तसेच राज्यसभेची निवडणूक ही सर्वसाधारणपणे बिनविरोधपणे पार पाडली जाते. अशा परिस्थितीमध्ये राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील घटक पक्ष हे ही निवडणूक बिनविरोध करणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajya Sabha Elections Announced: 7 Seats Up for Grabs in Maharashtra

Web Summary : Maharashtra's Rajya Sabha election for 7 seats is set for March 16th. Key leaders like Sharad Pawar's term ends April 2nd. With current assembly strength, MahaYuti can elect 6, MVA 1. Speculation surrounds Pawar's candidacy and potential uncontested election.
टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक 2026Maharashtraमहाराष्ट्रMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी