शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

पावसाचे शक्तिप्रदर्शन...! मुंबईसह कोकणला झोडपले; पुढील ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 05:39 IST

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर परिसराला झोडपले, रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडल्याने मुंबईकरांची दैना

मुंबई : संपूर्ण जून महिन्यात मुंबई आणि परिसराकडे पाठ फिरवणाऱ्या पावसाने मंगळवारी महामुंबई परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सोमवार रात्रीपासून पावसाने मुंबई उपनगरे आणि परिसराला झोडपून काढण्यास सुरुवात केली. मंगळवारी सकाळपासूनच पावसाने संततधार सुरू ठेवल्याने मुंबईतील सखल भागात पाणी साचले. त्यातच रेल्वे वाहतूकही कोलमडल्याने मुंबईकरांची दैना उडाली. महामुंबई परिसरात अनेक ठिकाणी पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले.

कुठे काय झाले?मंगळवारी दिवसभर धो-धो कोसळलेल्या पावसाने मुंबईची तुंबई करुन टाकली. दादर येथील हिंदमाता, माटुंगा येथील गांधी मार्केट, सांताक्रुझ येथील मिलन सब-वेसह कुर्ला, सायन आणि चेंबूर तुंबवून टाकले. तुंबलेल्या गुडघाभर पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांची अक्षरश: तारांबळ उडाली. तर अनेक भागांत वाहतूक मुंगीच्या गतीने पुढे सरकत होती. गेल्या २४ तासांत मुंबईत १०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली.

रायगड जिल्ह्यात मुसळधाररायगड जिल्ह्यालाही मंगळवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. दरडग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. पोलादपूर तालुक्यातील १२ गावांतील १७० कुटुंबांतील सदस्यांना स्थलांतरित केले आहे. संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १४३.८० मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

कोकणात पूरस्थितीरायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक जोर होता. रत्नागिरी जिल्ह्यात लांजात सर्वाधिक पाऊस ३४२ मिलीमीटर पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून, वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक २४०.३ मिलीमीटर पाऊस झाला. रायगड जिल्ह्यच्या पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त व पूरग्रस्त गावातील १७० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीकोल्हापूर जिल्ह्यात गगनबावड्यासह चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून, १९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, ‘एनडीआरएफ’च्या दोन तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या. सांगली, सातारा जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे.

विदर्भात अमरावती, वर्धा, गोंदियात पूरविदर्भात अमरावती, वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. आठवडी बाजारात हर्रासाकरिता आलेले ४२ व्यापारी व विक्रेते पुराच्या पाण्यात अडकल्याने त्यांना रेस्क्यू करीत सुखरूप बाहेर काढले. वर्धा, गोंदियात अतिवृष्टी झाली. अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला.

पनवेल तालुक्यातील डुंगी गाव पाण्याखाली

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरावामुळे पनवेल तालुक्यातील डुंगी गावात दीड ते दोन फूट पाणी साचले आहे, तर काहींच्या घरात पाणी गेल्याने मालमत्तेचे नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून अशीच स्थिती असून विमानतळाचा भराव त्यासाठी कारणीभूत असल्याचे डुंगी ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाणी घरांमध्ये शिरले होते. त्याचा फटका नागरिकांना बसला. कित्येकांचे संसार उघड्यावर आले आहेत. डुंगीसह अनेक गावांतही पावसाचे पाणी शिरण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे भविष्यात काय परिस्थिती उद्भवेल, या भीतीने ग्रामस्थ चिंताग्रस्त असतात.

अतिवृष्टीचा इशारा६, ७, ८, ९ जुलै मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.६ ते ८ जुलै दरम्यान रायगड आणि रत्नागिरी, सिधुदुर्ग, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता आहे.६ ते ८ जुलै दरम्यान कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता आहे.याशिवाय वरील काळात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र