शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

Rain Update : आजही जोरदार कोसळणार!'या' जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 08:14 IST

Rain Update : गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे पुणे, कोल्हापूर, सांगलीत पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Rain Update : राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काल पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तर पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक घरं पाण्यात आहेत. दरम्यान, आता काही जिल्ह्यात पुढचे तीन दिवस हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

पुण्यात पावसाचा कहर; घरांमध्येही शिरले पाणी, पर्यटनस्थळे बंद, चौघे जण दगावले

गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे कोयना, राधानगरी, चांदोली, खडकवासला या धरणांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणांचा विसर्ग वाढवण्यात आला असून काही ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अजून काही दिवस असाच पाऊस सुरू राहिला तर महापूराचा धोका आहे. 

हवामान विभागाने दिला अलर्ट 

हवामान विभागाने काही जिल्ह्यांना आजही रेड अलर्ट दिला आहे, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर , सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. धुळे, नंदूरबार, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

पुण्यात पावसाचा कहर

पुण्यात काल दिवसभरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे खडकवासला धरणाची पाणी पातळी वाढली, यामुळे विसर्गही वाढवण्यात आला. डेक्कन परिसरातील पुलाची वाडी येथे पहाटे नदीपात्रातील स्टॉल काढण्यासाठी गेलेल्या तिघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ताम्हिणी घाटातील आदरवाडीत दरड कोसळून शिवाजी बहिरट (रा. मुळशी) यांचा मृत्यू झाला असून, जितेंद्र जांभुरपाने (रा. गोंदिया) जखमी झाले आहेत.  लवासा सिटी येथे दरड कोसळली असून, त्यात तिघे अडकले. वारजे १५ म्हशी पाण्यात बुडाल्याने मृत्युमुखी पडल्या. मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. सर्वाधिक ५५६ मिमी ताम्हिणी घाटात नोंदला आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व धोकादायक पर्यटनस्थळे पुढील दोन दिवसांसाठी तातडीने बंद करण्यात आली आहेत.  जिल्ह्यातील २ प्रमुख राज्यमार्ग व ५ प्रमुख जिल्हामार्ग असे सात मार्ग बंद करण्यात आले आहेत. अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर गुरुवारी सर्व शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली. 

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊस