शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 10:43 IST

Maharashtra weather forecast: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून, मागील दोन दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागात पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांत काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. 

Maharashtra imd weather alert: राज्यात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. अनेक भागात शनिवारपासून पावसाचा जोर वाढला असून, पुढील २४ तासांत काही ठिकाणी अति मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे राज्यातील दोन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, तर काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कोकणातील काही ठिकाणी पुढील २४ तासांत अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गोवा आणि दक्षिण कोकण, त्याचबरोबर उत्तर कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. 

वाचा >>तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल

पालघर, मुंबई, ठाणे, नाशिक जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या भागांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

पुणे, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट

पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसरात पावसाचा जोर कायम राहणार आहे. सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्याचा काही भाग, सातारा जिल्ह्याचा काही भाग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

ऑरेंज अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांतील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. 

मराठवाडा, विदर्भ हवामान अंदाज काय?

मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान अंदाजMaharashtraमहाराष्ट्र