शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

महाराष्ट्रात परिस्थिती स्थिर; रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुटवडा दूर होतोय; आदित्य ठाकरे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 21:03 IST

Coronavirus : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे रुग्णवाढ. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा दूर झाल्याची आदित्य ठाकरेंची माहिती.

ठळक मुद्देराज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे रुग्णवाढ. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा दूर झाल्याची आदित्य ठाकरेंची माहिती.

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता. दरम्यान, आता ऑक्सिजनच्या बाबतीत महाराष्ट्रातील परिस्थिती स्थिर आहे, असं प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. तसंच सध्या रेमडेसिवीरचा होत असलेला काळाबाजार रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रासोबत आणि काही कंपन्यांच्या सहकार्यानं  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रशासनानं चर्चा केली आणि आता ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची कमतरता दूर झाली आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल याचा विचारही केला नव्हता. आता आपल्याला तिसऱ्या लाटेबाबतही तयार राहावं लागणार असल्याचंही ते म्हणाले. सध्या लोकांमध्ये इतकी भीती बसली आहे की हलकी लक्षणं असलेल्या लोकांनाही रुग्णालयात जायचं आहे. बेड्स बाबत किती सोय करण्यात आली आहे असा सवाल आदित्य ठाकरे यांना करण्यात आला. "जंबो सेटर्स महाराष्ट्रातच सर्वात पहिले उभारण्यात आले. ५ लाखांच्या आसपास महाराष्ट्रात बेड्स तयार केले गेले आहेत. लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागणं आवश्यक आहे. उपचारात कोणत्याही प्रकारची कमतरता दिसणार नाही कारण टास्क फोर्सच सारखीच आहे," असं उत्तर देताना ते म्हणाले. एनडीटीव्हीनं आयोजित केलेल्या NDTV Solutions Summit या कार्यक्रमादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.काही तरूण निष्काळजी"ज्या तरूणांना कोरोनाच्या प्रसाराची भीती नाही ते निष्काळजीपणे वागत आहे. त्यांनी बिलकुल घाबरून जाऊ नये. पण हे सर्दी, खोकला नाही. अशी काही लोकंही पाहिली ज्यांनी चाचणी केली नाही आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हा आजार बिलकुल हलक्यारितीनं घेऊ नये. डॉक्टर आणि प्रशासनावर भरवसा ठेवावा आणि काळजी घ्यावी," असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं. प्रवासी मजुरांवरही भाष्य"गेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक प्रवासी मजूर महाराष्ट्रातून परतले होते. परंतु यावेळी आम्ही ये-जा थांबवली नाही. यावेळी त्यावेळसारखी परिस्थिती नाही. गेल्या लॉकडाऊनमधून सर्वांनीच धडा घेतला आहे. आता परिस्थिती पहिल्यापेक्षा ठीक आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र