शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या आमदारांत अस्वस्थता; उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यात वर्षावर, तर फडणवीसांची राजभवनावर खलबते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 10:05 IST

Maharashtra Politics: पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळविल्यानंतर राज्यातील हालचालींना वेग आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळविल्यानंतर राज्यातील हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी वर्षा बंगल्यावर अर्धा तास चर्चा केली. 

 प्रत्येक राज्यात काँग्रेसला दुर्बल करण्याची भाजपची रणनीती कालच्या निकालावरून दिसते. काँग्रेसला मानणारा मतदार पद्धतशीरपणे अन्य लहान पक्षांकडे कसा वळेल, ही भाजपची खेळी दिसते. उद्या महाराष्ट्रातही तसेच झाले तर एकूणच महाविकास आघाडीला त्याचा फटका बसू शकतो, या मुद्यावर ठाकरे-पवार यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. कालच्या निकालानंतर विशेषत: शिवसेनेचे आमदार अधिक अस्वस्थ असल्याचे मानले जाते. त्यांना विश्वासात घेऊन महाविकास आघाडीने मजबुतीने सामोरे जाण्याची गरज बैठकीत व्यक्त झाली. 

 विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते आ. आशिष शेलार यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यातील सद्यस्थितीबाबत यावेळी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. १२ आमदारांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीचा मुद्दा, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय या चर्चेत होता, असे समजते. 

चार मंत्रीही राज्यपालांना भेटलेछगन भुजबळ, एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ आणि विजय वडेट्टीवार या चार मंत्र्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या विधेयकास मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच, विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी परवानगी मागितली. याविषयी आपण लवकरच राज्य सरकारला कळवू, असे राज्यपालांनी त्यांना सांगितले. 

राष्ट्रपती राजवट, बिलकूल नाहीभाजपच्या विजयानंतर आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यपालांशी भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना ही शक्यता फेटाळून लावली. १७० आमदारांचे भक्कम संख्याबळ आमच्याकडे असताना, राष्ट्रपती राजवटीचा प्रश्न येतोच कुठे, असा सवाल त्यांनी केला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेस