शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra POlitics: अशी कमी होणार महाराष्ट्रातली राजकीय कटुता

By अतुल कुलकर्णी | Updated: November 13, 2022 13:36 IST

Maharashtra Politics: महाराष्ट्रात राजकीय नेत्यांमध्ये निर्माण झालेली कटुता कमी केली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत म्हणाले. लगेचच दोन्ही बाजूंनी त्यासाठी जोरदार नियोजन करण्यात आलंय.

- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई आमच्या लाडक्या सौभाग्यवती,मुद्दाम तुम्हाला हे पत्र लिहित आहे. मी आता दोन-चार दिवस फार बिझी राहीन. अचानक खूप काम आले आहे. महाराष्ट्रात राजकीय नेत्यांमध्ये निर्माण झालेली कटुता कमी केली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत म्हणाले. लगेचच दोन्ही बाजूंनी त्यासाठी जोरदार नियोजन करण्यात आलंय. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्यात कटुता कमी करण्यासाठी नेमकं काय ठरलं याचा मास्टर प्लॅन मला मिळाला आहे...! उ. बा. ठा. शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही तसाच प्लॅन बनवल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे; मात्र त्याला अजून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्यता दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्यातली कटुता अजून संपली की नाही तेही मला पाहायचं आहे. त्यामुळे घरचा किराणा, भाजी महाग झाली, पेट्रोल महागलं, असल्या छोट्या प्रश्नांत मला वेळ नाही. गावाकडे पावसामुळे पिकांचं नुकसान झालं हे मला आता सांगत बसू नकोस. दरवर्षीच ते होतं. मंत्री, संत्रीच जर त्याकडे लक्ष देत नाहीत तर आपण तरी कशाला लक्ष द्यायचं..? मला खूप कामं आहेत. त्यातच हे नवीन काम आलं आहे. तेव्हा घरच्या फालतू विषयांमध्ये मला वेळ नाही. तू काय ते बघून घेशील..! नाहीतरी तुला काय काम आहे...?तुम्हाला सांगतो बबन्याची आई, खूप मोठं नियोजन सुरू आहे. संजय राऊत जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जातील, तेव्हा ते सोबत कोकणातल्या हापूस आंब्याचं खोकं नेणार आहेत. फडणवीसदेखील त्यांना भेटीदाखल नागपूरच्या संत्र्यांचं खोकं देणार आहेत. त्यामुळे मला खोके आणायला जायचं आहे. संत्र्यांचे खोके मुलुंडपर्यंत नीट येण्यासाठी राऊतांनी दोन गाड्या सांगितल्या आहेत. जितेंद्र आव्हाडांमुळे ‘हर हर महादेव’ सिनेमा आता हाऊसफुल्ल चालू लागला आहे. त्यामुळे निर्मात्यांनी त्यांच्याकडे काजूकतलीचे खोके पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मध्येच माशी कुठे शिंकली हे तपासायचं आहे, कारण त्यांना पोलिसांनी अटक केली होती.... राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात सुरू आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे सगळे नेते यात्रेत गेले. आता शिवसेनेचे नेते जाणार आहेत. त्यांच्यातली कटुता मिटली आहे; मात्र बाळासाहेब थोरात, दोन चव्हाण, नाना पटोले, भाई जगताप यांनी कसोशीने त्यांच्यातली कटुता राहुल गांधींना कळू नये, यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्यातली कटुता मिटावी म्हणून स्वतः शरद पवार यांनी दोन्ही चव्हाणांना वेगवेगळे बोलावून चार समजुतीच्या गोष्टी सांगण्याचे ठरवले आहे. त्यावरूनही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. शरद पवार कोणत्या चव्हाणांना आधी बोलावतात आणि कोणाला नंतर..? यासाठी बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी आपापले दूत माहिती काढायसाठी कामाला लावले आहेत. सगळा नुसता गुंता होऊन बसला आहे. तरीपण कटुता संपवावी लागेल, म्हणून आता एकनाथ शिंदे यांनी उ. बा. ठा. शिवसेनेच्या काही आमदारांना वॉशिंग मशीनचे खोके पाठवायची तयारी सुरू केली आहे. नेमके किती खोके आणायचे हेदेखील ठरवायचं आहे. नुसते कपडे धुऊन देणारी आणि धुतलेले कपडे वाळवून देणारी; अशा दोन वॉशिंग मशीन आहेत. कोणाला कोणती वॉशिंग मशीन हवी, त्यानुसार खोके पॅक करावे लागतील. कटुता कमी करायची तर हे सगळं करावं लागेल मंडळी... त्याशिवाय कटुता कशी कमी होणार..? एकदा का कटुता मिटली की फडणवीस, राऊत, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील सगळे मिळून एकाच बसमधून अयोध्येला जायचं ठरलं आहे. त्यामुळे त्याचीही मला तयारी करायची आहे. मंडळी, डोळ्यासमोर चित्र उभं करा... हे सगळे लोक एकाच बसमध्ये बसून अयोध्येला निघाले आहेत...! किती धमाल चित्र असेल ते...! महाराष्ट्र या एकाच घटनेने एकदम सुजलाम् सुफलाम् होईल...! चार उद्योग महाराष्ट्रातून गेले काय, आणि दहा नोकऱ्या कमी मिळाल्या काय... काही फरक पडणार नाही. कटुता कमी होणं महत्त्वाचं आहे. तेव्हा मला माझं काम करू द्या..! डिस्टर्ब करू नका... तुम्ही घरचं बघून घ्या, दारचं मला बघू द्या...!- तुमचाच बाबूराव

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण