शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 10:36 IST

Maharashtra Politics : राज्यात विधानसभा निवडणुकांची काही दिवसात घोषणा होणार असून सर्वच पक्षांनी तयारी सुरू आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) :  राज्यात विधानसभा निवडणुकांची काही दिवसात घोषणा होणार असून सर्वच पक्षांनी तयारी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, काल उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या भाषणात ते महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करत असल्याचे समोर आले आहे. या विधानावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

"लग्नाला पोरगी पाहिजे असेल, तर पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी स्मार्ट हवी असेल, तर ती तुमच्या माझ्यासारख्या पोरांना भेटत नाही, नोकरीवाल्यांना भेटते.  दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते, ज्यांचा पानठेला आहे, धंदा किराणा दुकान आहे, अशा माणसांना दोन नंबरची पोरगी भेटते आणि तीन नंबरचा गाळ राहिलेली पोरगी शेतकऱ्यांच्या पोरांना भेटते. शेतकऱ्यांच्या पोरांचं काही खरं राहिले नाही, अशा वादग्रस्त विधानाचा जाहीर सभेतील एक व्हिडीओ बुधवारी आमदार देवेंद्र भुयार यांचा व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भुयार यांच्यावर टीका केली. दरम्यान, आता या टीकेला अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं

आमदार देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, "देवेंद्र भुयार यांच्या विधानाचा विपर्यास करुन त्यावर राजकीय पोळी भाजण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत, त्यांनी ते वक्तव्य आधी ऐकावं. विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचीही अवस्था बिकट आहे. मराठवाडा आणि विदर्भात मुलांना ३५ शी ओलांडल्यानंतरही मुली भेटणे मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यालाच वाटते आपली मुलगी शेतकऱ्याच्या घरी सून म्हणून जाऊ नये. हीच वस्तुस्थिती आमदार भुयार यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये मांडलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा सोईच्या पद्धतीने घेतले गेले. 

"देवेंद्र भुयार एवढे वादग्रस्त बोलले नाहीत. ते विधान फक्त आता रंगवले जात आहे. ते एक शेतकरी पुत्र आहेत. त्यांच्या विधानाचा विपर्यास करुन जाणीवपूर्वक अजितदादा आणि त्यांच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न सूरू आहे, असा आरोपही आमदार अमोल मिटकरी यांनी केला.    

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAmol Mitkariअमोल मिटकरी