शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

Maharashtra Politics : महायुतीत फूट? राष्ट्रीय समाज पक्षाचा स्वबळाचा नारा, महादेव जानकर स्पष्टच बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 14:16 IST

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर रासप नेते महादेव जानकर यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी आहे. पण, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chadrashekhar Bwankule) यांनी केलेल्या एका विधानामुळे महायुतीत फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी विधानसभेला 288 पैकी भाजप 240 तर शिवसेना (शिंदे गट) 48 जागा लढेल, असे बावनकुळे म्हणाले. त्यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटातून आक्रमक प्रतिक्रिया आल्या. तसेच, भाजपचा विश्वासू मित्रपक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. 

लोकसभाही स्वबळावर लढूमाध्यमांशी बोलताना महादेव जानकर म्हणाले की, 'भाजपने जागा वाटप जाहीर केले आहे, त्यात आमचा विचार केलेला नाही. शिंदे गट आणि भाजप एकत्र मिळून निवडणूक लढणार असल्याचे दिसत आहे. आम्हाला सोबत घेण्याची भाजपाची इच्छा नसेल तर, आम्हीही त्यांच्या मागे लागणार नाहीत. आमच्या ताकदीवर 48 लोकसभा निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे. सोबत घेतले तर ठीक अन्यथा स्वबळावर लढू,' अशी स्पष्टोक्ती जानकर यांनी केली.

आमही अनेक ठिकाणी ताकतते पुढे म्हणतात, 'आपल्या चौकात आपली औकात वाढवली पाहिजे. आम्ही सध्या दोन आमदार आहोत. मी वरच्या सभागृहात आहे तर दुसरा खालच्या सभागृहात आहे. आमच्याकडे 98 जिल्हा परिषदा आहेत, तर तीन सभापतीदेखील आहेत. आसाम आणि कर्नाटकात एक-एक जिल्हा परिषद सदस्य आहे. गुजरातमध्ये माझे 28 नगरसेवक आहेत. चार राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाला टेक्निकली मान्यता मिळाली आहे. जर भाजपला आमची गरज वाटत नसेल तर आम्ही स्वतंत्र लढणार आहे,' असंही ते यावेळी म्हणाले. 

भाजपकडे लोकसभेचा प्रस्तावभाजपाकडे आम्ही लोकसभेच्या पाच जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. जिथे आमची लढण्याची औकात आहे, तिथेच जागाच मागत आहोत. तो प्रस्ताव मान्य नसेल आणि त्यांना एकनाथ शिंदेंबरोबर आघाडी करण्याचे ठरवले असेल, तर त्यांना शुभेच्छा आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष भाजपावर अवलंबून नाही. भाजपाला गरज वाटली, तर आम्हाला सोबत घेतील, अन्यथा आम्हाला आमचा रस्ता मोकळा आहे,' असंही जानकर यावेळी म्हणाले. त्यामुळे बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटापोसब इतर मित्रपक्षही नाराज असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे