Maharashtra Politics ( Marathi News ) : नागपुरात महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान मोठ्या घडामोडी सुरू आहेत. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. आता दुसऱ्याच दिवशी तासगाव कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील अजित पवार यांच्या निवासस्थानाजवळ भेटीसाठी पोहोचले आहेत. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
...और वो आईना साफ करता रहा; ईव्हीएमवर खापर फोडणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले
गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार पटेल, खासदार सुनिल तटकरे यांनी खासदार शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, ही भेट शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होती अशी बोलली जात आहे. तर दुसरीकडे ही भेट राजकीय असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, दोन दिवसापूर्वी आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार जयंत पाटील सत्तेत येणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. दरम्यान, आता दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांच्या वाढलेल्या भेटीगाठी यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आणखी वाढल्या आहेत.
'मतदारसंघातील कामांसाठी भेटायला आलो'
दरम्यान, आज आमदार रोहित पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटीआधी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी ही भेट मतदारसंघातील विकास कामासंदर्भात असल्याचे सांगितले होते. रोहित पाटील म्हणाले, मी पत्र देण्यासाठी आलो आहे. काल मी विधिमंडळात मतदारसंघातील कामाबाबत पत्र देण्याचा प्रयत्न केला. दादा बोलले इथं योग्य दिसत नाही, तुम्ही मला उद्या सकाळी बंगल्यावर भेटा, मी बंगल्यावरती पत्र देण्यासाठी आलो आहे, असंही रोहित पाटील म्हणाले.
"मी तर माझ्या मतदारसंघातील कामासाठी पत्र द्यायला आलो आहे. माझ्या मतदारसंघात ऊर्जा विभागाकडून मला नवीन डीपी हवे आहेत. या मागणीसाठी मी दादांची भेट घ्यायला आलो आहे, असंही आमदार रोहित पाटील म्हणाले.