शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 13:21 IST

CM Eknath Shinde : महायुतीमध्ये मुख्यमंत्रि‍पदासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.

CM Eknath Shinde ( Marathi News ) : महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन घडामोडींना वेग आला आहे.  काल केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीमधील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत सरकार स्थापने संदर्भात शाह यांनी सूचना दिल्या. यानंतर आता आज मुंबईत महायुतीची बैठक होणार होती. पण, अचानक ही बैठक रद्द करण्यात आली आहे. 

Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?

महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस या तिनही नेत्यांची आज मुंबईत बैठक होणार होती.  काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांचे मूळगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजपा गटनेता निवड झाल्यानंतर महायुतीची बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.    

भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री 

भाजपला राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हवे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीत एकजूट असल्याचा मेसेज देण्यासाठी भाजपकडून हा आग्रह केला जात आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने राजकीय सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. महायुतीच्या नेत्यांची गुरुवारी (२८ नोव्हेंबर) रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीनंतरही मुख्यमंत्री कोण आणि सत्तेच्या वाटाघाटीचा तिढा सुटलेला नाही.  

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये काम करण्यास सांगितले होते. आता देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री पद दिले जाणार आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुती