Maharashtra Politics ( Marathi News ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. शिवसेनेतील नेत्यांसह राष्ट्रवादीतील नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. रविवारी एकाचवेळी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. मंत्रिपदासाठी अनेक नेते इच्छुक होते. राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिपदासाठी इच्छुक होते, पण त्यांना मंत्रिमंडळत स्थान मिळालेले नाही. यामुळे आता ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, जी लोक चांगली काम करतात त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाली पाहिजे. छगन भुजबळ यांच्या नाराजीवर बोलताना भरणे म्हणाले, भुजबळ साहेब माझ्यामते अजिबात नाराज नाहीत. ते राज्याचे नेते आहेत. आमचे वरिष्ठ नेते त्यांच्याबाबतीत योग्य निर्णय घेतील.
"आमच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. आमचे वरिष्ठ नेतेच या बाबतीत सांगू शकतील, असंही दत्तात्रय भरणे म्हणाले. मी कोणत्याही खात्याची अपेक्षा करत नाही. जनतेची सेवा करणे हेच माझे ध्येय आहे, असंही ते म्हणाले.
अजित पवार यांच्या गटातील नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
या नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
१. नरहरि झिरवळ२. हसन मुश्रीफ३. धनंजय मुंडे४. अदिती तटकरे५. बाबासाहेब पाटील६. दत्तात्रय भरणे७. मकरंद पाटील८. इंद्रनील नाईक९. माणिकराव कोकाटे