Maharashtra Politics : भविष्यात मोठी MPSC भरती, स्पर्धा परीक्षाबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:35 IST2025-03-19T16:32:01+5:302025-03-19T16:35:51+5:30

Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात एमपीएससी परीक्षा संदर्भात मोठी घोषणा केली.

Maharashtra Politics Big MPSC recruitment in the future, Devendra Fadnavis' big announcement regarding competitive exams | Maharashtra Politics : भविष्यात मोठी MPSC भरती, स्पर्धा परीक्षाबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Maharashtra Politics : भविष्यात मोठी MPSC भरती, स्पर्धा परीक्षाबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Maharashtra Politics ( Marathi News ) : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी परीक्षा संदर्भात मोठी घोषणा केली. एमपीएससीकडून स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. पण, सध्या एमपीएससीच्या कारभारावर टीका सुरू आहेत. विद्यार्थ्यांचा रोष पाहायला मिळत आहे. परीक्षेचे टाईमटेबल, निकाल यामध्ये होणारी दिरंगाई यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावरुन आमदार शिवाजीराव गर्जें यांच्याकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर देत मोठ घोषणा केली. 

औरंगजेब सध्याच्या घडीला सुसंगत नाहीये; हिंसाचारानंतर आरएसएसने सोडलं मौन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीबाबत मोठी घोषणा केली. तसेच आता युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीमध्येही कॅलेंडर आणणार असल्याचे जाहीर केले. येणाऱ्या काही दिवसात एमपीएससी मार्फत मोठी भरती घेणार असल्याची त्यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, युपीएससी प्रमाणेच आता एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असावे असा प्रयत्न आहे. एमपीएससी परीक्षा या वर्षापासून आपण डिस्क्रीप्टिव्ह स्वरुपात घेणार आहोत. अर्थातच, या प्रक्रियेला काहींचा विरोध आहे, मात्र आपण हा विरोध ग्राह्य धरणार नाही, असंही फडणवीस म्हणाले. तसेच एमपीएससी महामंडळात ज्या रिकाम्या जागा आहेत त्यापैकी एक जागा पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

एमपीएससी मंडळात ज्या रिकाम्या जागा आहेत, त्यापैकी एक जागा पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच उर्वरीत दोन जागांसंदर्भात आपण ॲड देतो आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. 

एमपीएससीमार्फत भविष्यात मोठ्या प्रमाणात भरती प्रकिया करतोय, तसेच, परिक्षेचा निकाल आला तेव्हापासून आपण वेगाने काम केलं, तरी देखील मी मान्य करतो की अजून वेगाने काम करू, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Web Title: Maharashtra Politics Big MPSC recruitment in the future, Devendra Fadnavis' big announcement regarding competitive exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.