शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 19:59 IST

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचे बोलले जात आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे विधानसभेपूर्वीच राजकीय वर्तुळात भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री  अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता आमदार बच्चू कडू यांनीही याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

उपमुख्यमंत्री अजित पवार  महायुतीमधून बाहेर पडतील असं विधान कर बच्चू कडू यांनी तसे संकेत असल्याचे म्हटले आहे. गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आज आमदार बच्चू कडू यांनीही याबाबत वक्यव्य केले. 

आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार

आज पत्रकार परिषदेत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केले. पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू यांनी माध्यम प्रतिनिधींनी पंकजा मुंडे यांच्याबाबात प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, पंकजा मुंडे यांचे खरं आहे, विधानसभेत आता धनंजय मुंडे आहेत. अजित पवार जर महायुतीतून बाहेर गेले तर त्यांची जागा त्यांना मिळेल. नाही गेले तर पंकजा मुंडे यांना जागा मिळणार नाही. सगळ्या आघाडी आणि युतीमध्ये बऱ्याच फुटफाट होईल असं चित्र वाटत आहे. ते बाहेर पडतील आणि आमची महाशक्ती होईल. त्यांना आमच्या आघाडीत घ्यायचं की नाही हे आमची सुकाणु समिती ठरवेल, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले. ते महायुतीमधून बाहेर पडतील असे काही संकेत आहेत. जसे तुमचे सुत्र असतात तसे आमचेही सुत्र आहेत, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले. या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.  

'दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये'

मनोज जरांगे पाटील यांचं आता तिसर, चौथ उपोषण आहे. या आरक्षणाबाबत जो काही घोळ केला आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. याच मुळात काय कारण आहे ते शोधल पाहिजे. केंद्रात सरकार तुमचं आहे, केंद्रात तुम्ही दहा टक्के वाढवून घ्या. सरकारने आता या भूमिका घेतल्या पाहिजेत. आता कोर्टात टीकेल का नाही हे माहित नाही. राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा अशी दरी निर्माण होत आहे. ओबीसी समाजाला विश्वास देणे महत्वाचे आहे. राजकारणाठी दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024