शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde : "50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात तेव्हा याचा अर्थ..."; एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 17:22 IST

Maharashtra Political Crisis Shivsena Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना भाजपा समर्थन देईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. य़ानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. त्यांना भाजपाचा पाठिंबा देईल. या सरकारला माझे समर्थन असेल अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आम्ही सत्तेच्या पाठिशी नाही. कुठल्यातरी मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही काम करत नाही. ही तत्वाची, हिंदुत्वाची आणि विचारांची लढाई आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपा समर्थन देईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. य़ानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 50 आमदार का वेगळी भूमिका घेतात? याबाबत स्पष्टच सांगितलं आहे. 

"राज्याच्या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो आहेत. 50 आमदार एकत्र आहोत. जे काही अडीच वर्षांपूर्वी घडलं ते आपल्याला माहिती आहे. गेल्या काही काळात आम्ही मुख्यमंत्र्यांना मतदार संघातील समस्या, अडचणी याबाबत वारंवार माहिती दिली. मी अनेकवेळा चर्चा केली. जी काही नैसर्गिक युती होती. एकत्र निवडणुका लढवल्या. आमदारांमध्ये जी नाराजी होती. राज्याच्या हिताच्या दृष्टीने जे काही घडत होतं. काही सहकाऱ्यांवर झालेल्या कारवाई... महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेता येत नव्हते. हे सगळं होत असताना 50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात याचा अर्थ म्हणजे आत्मपरिक्षण करण्याची गरज होती. मोठ्या प्रमाणात 50 लोक एकत्र आले. त्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. त्यामुळे हा निर्णय घेतला असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

"बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिल्याबद्दल फडणवीसांचे मनापासून त्यांचे आभार. फडणवीसांनी मोठेपणा दाखवला. मोठं संख्याबळ त्यांच्याकडे आहे. मुख्ममंत्री पद त्यांनाही घेता आलं असतं. पण मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना पाठिंबा दिला. सर्व ५० आमदारांनी जी लढाई लढलीये, वैचारिक भूमिका घेऊन, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका घेऊन. धर्मवीरा आनंद दिघेंची शिकवण आहे, अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलंय. त्यांनी जो विश्वास दाखवलाय त्याला कदापी तडा जाऊ दिला जाणार नाही" असं देखील शिंदे यांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस