Maharashtra Political Crisis: शरद पवारांची उद्धव ठाकरेंशी साधी चर्चासुद्धा नाही; सायंकाळी मुंबईला निघणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:30 IST2022-06-21T14:29:22+5:302022-06-21T14:30:11+5:30
राज्यातील राजकीय संकटावर शरद पवार यांनी दिल्लीत नुकतीच पत्रकार परिषद घेतली. शिंदे आणि आमदार कोणत्या हॉटेलमध्ये थांबलेत ते देखील आपल्याला माहिती नसल्याचे पवारांनी सांगितले.

Maharashtra Political Crisis: शरद पवारांची उद्धव ठाकरेंशी साधी चर्चासुद्धा नाही; सायंकाळी मुंबईला निघणार
एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड हे शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. यामुळे त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यावर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शिंदे आणि आमदार कोणत्या हॉटेलमध्ये थांबलेत ते देखील आपल्याला माहिती नसल्याचे पवारांनी सांगितले.
राज्यातील राजकीय संकटावर शरद पवार यांनी दिल्लीत नुकतीच पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरेंशी यावर काही बोलणे झालेय का? असा सवाल करताच माझे त्यांच्याशी बोलणे झालेले नाही, असे ते म्हणाले. शिवसेना आमदारांची दुपारी बैठक घेतली जाणार आहे, त्यानंतर कळवतो, असा आपल्याला निरोप आला असल्याचे पवार म्हणाले.
तसेच आता आपण मुंबईला जाण्यासाठी निघणार आहे. मुख्यमंत्री पद कोणाला द्यावे हा विषय शिवसेनेचा आहे. एकनाथ शिंदेंनी ते मागितल्याचे आपल्या ऐकिवात नाही, असेही पवार म्हणाले. तसेच कोणा कोणाशी बोलेल, हे आपल्याला कसे माहिती असणार असे त्यांनी शिंदे आणि शहा यांच्यात चर्चा होणार असल्याच्या वृत्तावर म्हटले.