शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis : "आदित्य पक्षातील घाण गेली म्हणतात अन् मुख्यमंत्री आमदारांना आवाहन करतात, किती नाटकीपणा?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 16:49 IST

Maharashtra Political Crisis BJP Keshav Upadhye And Uddhav Thackeray : पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी आमदारांसाठी चर्चेची दारं खुली केली आहेत. याच दरम्यान भाजपाने ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा त्यांना समोर येऊन चर्चा करण्याचं आवाहन केले आहे. शिंदे गटानं उद्धव ठाकरेंकडेभाजपासोबत युती करा अशी आग्रही मागणी केली आहे. राष्ट्रवादी शिवसेना संपवतेय असा आरोप बंडखोर आमदारांकडून केला जात आहे. त्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी आमदारांसाठी चर्चेची दारं खुली केली आहेत. याच दरम्यान भाजपाने ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"आदित्य पक्षातील घाण गेली म्हणतात अन् मुख्यमंत्री आमदारांना आवाहन करतात, किती नाटकीपणा?" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "मुख्यमंत्री एकीकडे मंत्र्याचे खाती काढतात. आदित्य ठाकरे हे आमदारांना उद्देशून पक्षातील घाण गेली म्हणतात. संजय राऊत बळीची भाषा करतात आणि एवढ सगळं झाल्यावर परत उद्धव ठाकरे आमदारांना भावनिक आवाहन करतात. किती देखावा किती नाटकीपणा?" असं म्हटलं आहे. 

केशव उपाध्ये यांनी "सत्ता गेली, संघटना गेली, सहानभूती, हिंदुत्व सुटलं पण गेली अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद मिळाले पण वर्षानुवर्षांची पुण्याईसुध्दा गेली" असं म्हणत बोचरी टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आज पहिल्यांदाच एकनाथ शिंदे हे हॉटेलच्या गेटवर आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांसोबत बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला आव्हान दिले. 'आमचे कोणतेही आमदार कुणाच्या संपर्कात नाहीत, जे कुणी संपर्कात असतील, त्यांची नावं सांगा, असे एकनाथ  शिंदेंनी म्हटले आहे.

दोन-तीन दिवसात भाजपचे सरकार येणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, असा विश्वास भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीची महापूजा त्यांच्या हस्ते होईल. त्याचसोबत फक्त आमदारच नाही तर शिवसेनेचे १०-१२ खासदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला. सुप्रीम कोर्टाने बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईला १२ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे आमदारांवर कुठलीही कारवाई होणार नाही, असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरेSanjay Rautसंजय राऊत