शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

ड्रग्ज तस्करांच्या 'टार्गेट'वर महाराष्ट्र; महाराष्ट्रात हायब्रिड गांजाची तस्करी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:55 IST

Nagpur : कर्नाटक व गुजरातनंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात अमलीपदार्थाच्या तस्करीची नवी रूपं समोर येत असून, उच्च क्षमतेच्या हायब्रिड गांजाची मागणी आणि तस्करी झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र तस्करांच्या टार्गेटवर असून, यावर्षी राज्य हायब्रिड गांजाच्या तस्करीप्रकरणी देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा गांजा प्रामुख्याने थायलंडवरून येत असून, बरेचदा तस्करीसाठी हवाई मार्ग किंवा कुरिअरचादेखील वापर करण्यात येतो, अशी माहिती समोर आली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाची ही अधिकृत आकडेवारी यंत्रणेची झोप उडविणारी आहे. २०२३ पासून हायब्रिड गांजाच्या तस्करीचे प्रमाण वाढले. तस्करांकडून महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू आणि या वर्षी गुजरातवरदेखील भर देण्यात येत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या तीनही राज्यांची सीमा लागूनच असल्याने तस्करांकडून हवाई मार्गाने आलेला हायब्रिड गांजा रस्तेमार्गाने इतर ठिकाणी पाठविण्यात येतो. २०२३ पासून ते मे २०२५ या कालावधीत महाराष्ट्रात १३७.७९७ किलो हायब्रिड गांजा जप्त करण्यात आला आहे, तर दाखल झालेल्या ४५ गुन्ह्यांत १९ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. २०२५च्या पहिल्या पाच महिन्यांतच ४६ किलो हायब्रिड गांजा जप्त झाला.

थायलंडहून थेट होते तस्करीहायब्रिड गांजाचे उत्पादन हे प्रामुख्याने थायलंडमध्ये होत आहे. तेथून आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवा किंवा मानववाहक पार्सलद्वारे गांजा भारतात आणण्यात येतो. भारतात गांजा आल्यावर तो ड्रग पेडलर्सच्या माध्यमातून तरुणाईपर्यंत पोहोचविला जात आहे.

कर्नाटक व गुजरातनंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक२०२५ मध्ये मेअखेरपर्यंत देशभरात ३७३ किलो हायब्रिड गांजा जप्त करण्यात आला असून, ५६ प्रकरणांमध्ये ७७ अटक करण्यात आल्या आहेत. कर्नाटक (१५८ किलो), गुजरात (८५ किलो) या राज्यांनंतर महाराष्ट्र (४६ किलो) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हायब्रिड गांजा म्हणजे काय ?

  • हायब्रिड गांजाला 'हायड्रोपॉनिक गांजा' असेही म्हटले जाते. याची लागवड मातीत न करता, पोषक द्रवपदार्थांमध्ये नियंत्रित वातावरणात केली जाते.
  • हा गांजा अधिक तीव्र व जास्त नशा देणारा असतो तसेच याचे अनेक दुष्परिणामदेखील असतात. याचे प्रमाण भारतात वाढत असून, तरुणांमध्ये याची मागणी वाढते आहे.

हायब्रिड गांजाच्या तस्करीत जप्त माल (किलोमध्ये)राज्य              २०२३           २०२४              २०२५ (मेपर्यंत)कर्नाटक           ८.४             ५६                   १५८तामिळनाडू      १३४.२९          ६                     ५४महाराष्ट्र          १९.४७५        ७२.३२२              ४६गुजरात           ५.९५७         २२.३२६               ८५

टॅग्स :nagpurनागपूरDrugsअमली पदार्थSmugglingतस्करी