शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

शरद पवारांना नावही माहित नव्हतं, पण आता जवळीक कशी झाली; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2021 11:23 AM

Jitendra Awhad-Sharad Pawar : एकेकाळी शरद पवार यांना त्यांचं नावही ठाऊक नव्हतं आणि त्यांच्यातील जवळीक कशी वाढत गेली याबद्दल एक किस्सा आव्हाड यांनी सांगितला.

ठळक मुद्देएकेकाळी शरद पवार यांना त्यांचं नावही ठाऊक नव्हतं आणि त्यांच्यातील जवळीक कशी वाढत गेली याबद्दल एक किस्सा आव्हाड यांनी सांगितला.

राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यातील जवळीक सर्वांच्याच परिचयाची आहे. परंतु एकेकाळी शरद पवार यांना त्यांचं नावही ठाऊक नव्हतं आणि त्यांच्यातील जवळीक कशी वाढत गेली याबद्दल एक किस्सा आव्हाड यांनी सांगितला. लोकमतच्या फेस टू फेस या कार्यक्रमात आव्हाड यांनी लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांच्यासोबत साधलेल्या संवादात आपल्या लहानपणापासून ते राजकारणापर्यंतच्या प्रवासाचा उलगडा केला. यावेळी बोलताना आव्हाड यांनी १९८८ मध्ये सुरेश कलमाडींनी आपल्याला पहिल्यांदा शरद पवार यांच्याकडे नेलं होतं असं सांगितलं."सुरेश कलमाडी यांनी सर्वप्रथम मला शरद पवार यांच्याकडे नेलं. त्यानंतर पद्मसिंह पाटील यांच्यासोबतही माझे चांगले संबंध होते. शरद पवार हे दिल्लीवरून विमानतळावर आले तरी मी त्या ठिकाणी उभा असायचो आणि ते जात असले तरी मी विमानतळावर उभा असायचो. कोणत्याही ठिकाणी गेले तरी मी विमानतळावर जायचो. जवळजवळ १२ वर्ष मी हे केलं. आधी त्यांचं लक्ष नसायचं. पण जसं जसं त्यांना माझा चेहरा परिचयाचा वाटायला लागला तेव्हा त्यांनी ओळखही देण्यास सुरूवात केली," असं आव्हाड म्हणाले."एकदा त्यांनी मला घरी जाण्यासाठी गाडी आहे का असंही विचारलं. त्यानंतर तो किस्सा मी घरी आईला जाऊन सांगितला. तो एक वेगळा काळ आणि माझं पॅशन होतं. एकदा त्यांना मी पुण्याला भेटलो. ते विमानानं मुंबईला येऊन रात्री इस्रायलला जाणार होते. नशीबानं दुसऱ्या विमानातून सुरेश कलमाडी आले. त्यांच्या पीएनं मला विमानानं मुंबईला जा असं म्हटलं. त्यानंतर घरी आलो लगेच तयार होऊन पुन्हा शरद पवारांना सोडायला विमानतळावर गेलो. त्यावेळी त्यांनीही मला विचारलं एवढ्यात कसा आलास अशी विचारणा केली," असा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस