शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मनसेचे आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 9:41 PM

Raju Patil : संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं राजू पाटील यांचं आवाहन

ठळक मुद्देसंपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं राजू पाटील यांचं आवाहनगेल्या चोवीस तासांत राज्यात आजवरची सर्वात मोठी रुग्णवाढ

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या ही चिंताजनक आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहेत. तसंच सरकारकडूनही सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली. तसंच संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. "गेले वर्षभर कोरोनासोबत लपंडाव खेळत होतो. पण तुर्तास कोरोनाच्या तावडीत सापडलोच. गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, आवश्यक वाटल्यास कोरोना चाचणी करावी. कोरोना बरा होतो. लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा जोमाने कामाला लागेन," अशा आशयाचं ट्वीट राजू पाटील यांनी केलं आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंदकोरोना विषाणूची महासाथ सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच बुधवारी राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात बुधवारपेक्षाही अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासांत राज्यात आजवरची सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत राज्यात ३५ हजार ९५२ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दुसरीकडे थोडी दिलासादायक बाब म्हणजे २० हजार ४४४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत २६ लाख ८३३ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत २२ लाख ८३ हजार ०३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात सध्या २ लाख ६२ हजार ६८५ अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ५३ हजार ७५९ मृत्यूंची नोंद झाली.

टॅग्स :MNSमनसेRaju Patilराजू पाटीलkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीcorona virusकोरोना वायरस बातम्या