Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 09:08 IST2025-12-21T07:11:48+5:302025-12-21T09:08:58+5:30

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Results 2025 Live: राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीची मतमोजणी ...

maharashtra nagar parishad nagar panchayat local body election results 2025 live news updates check winners list in marathi | Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात

Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election Results 2025 Live: राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीची मतमोजणी रविवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून, दुपारपर्यंत विजयाचा गुलाल उधळला जाईल. पहिल्या टप्प्यात २ डिसेंबरला झालेली निवडणूक आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष व १४३ सदस्यपदांसाठी शनिवारी झालेल्या मतदानात कोणाला कौल मिळाला, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

LIVE

Get Latest Updates

21 Dec, 25 : 09:26 AM

सोलापूर जिल्ह्यात ११ पैकी ९ नगरपालिका भाजपा जिंकेल : सचिन कल्याणशेट्टी

सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी पहिल्यांदाच सर्व नगरपालिका लढत आहे. जिल्ह्यात ११ नगरपालिकापैकी किमान ९ नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल.  जिल्ह्यात भाजपाला चांगल यश मिळेल असं वाटतंय. अक्कलकोट, मैंदर्गी आणि दुधनी या तिन्हीही नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा चांगल्या मताधिक्याने फडकेल.

21 Dec, 25 : 09:15 AM

Nagar Parishad Election Results 2025 : कोकणातही मोठी लढत, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

कोकणातही यावेळी नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी चुरशीने मतदान झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषदा आणि एक नगरपंचायत यासाठी निवडणूक मतदान प्रक्रिया २ डिसेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सावंतवाडी नगरपरिषदेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात खरी स्पर्धा दिसून येईल.

21 Dec, 25 : 08:58 AM

Maharashtra Local Body Election Results 2025: गडचिरोलीतही मतमोजणीची तयारी पूर्ण; १० वाजता सुरुवात होणार

गडचिरोली जिल्ह्यात तीन नगर परिषदेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. कृषी महाविद्यालयात स्ट्राँग रुम तयार असून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.

21 Dec, 25 : 08:48 AM

Maharashtra Election Results 2025: पंढरपुरातही मतमोजणीला काही वेळात सुरुवात होणार

पंढरपुरात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

21 Dec, 25 : 08:42 AM

Maharashtra Election Results 2025: कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपालिकांची मतमोजणी

कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानासाठी आज मतमोजणी होणार आहे. सर्वच मतमोजणी केंद्रावरील तयारी पूर्ण झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी ५६ उमेदवारांनी, तर २६३ सदस्यपदांच्या जागांसाठी ८०९ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. जयसिंगपूरला पाच, कागल-हातकणंगलेला सात फेऱ्या होणार आहेत. निकालासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज आहे.

21 Dec, 25 : 07:49 AM

Maharashtra Election Results 2025: काही ठिकाणी महायुतीमध्येच लढती

कोकणात भाजप-शिंदेसेनेने एकमेकांचे नेते पळविल्याने दोन पक्षांमध्ये कमालीची कटूता आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, असे चित्र प्रकर्षाने दिसले. शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे विरुद्ध भाजप असा संघर्ष टोकाला गेला. मराठवाड्यात काही ठिकाणी भाजपचे आणि शिंदेसेनेचे नेते एकमेकांना भिडले.

21 Dec, 25 : 07:26 AM

एक्झिट पोल'च्या अंदाजात भाजप अग्रेसर

तीन मराठी वृत्तवाहिन्यांनी नगरपरिषद निवडणुकीचा एक्झिट पोल दिला असून, त्यात भाजप हा निर्विवादपणे क्रमांक एकचा पक्ष राहील असे म्हटले आहे. दोन वृत्तवाहिन्यांनी दुसऱ्या क्रमांकावर शिंदेसेना, तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असेल. त्यानंतर अजित पवार गटाला यश मिळेल, असा अंदाज वर्तविला आहे. अन्य एका वृत्तवाहिनीने भाजपकडे १४७ नगरपरिषदांची अध्यक्षपदे जातील, असे म्हटले असून, शिंदेसेना क्रमांक २ वर, अजित पवार गट क्रमांक ३ वर, तर काँग्रेस क्रमांक ४ वर राहील, असे म्हटले आहे. एक्झिट पोलचे हे अंदाज कितपत खरे ठरतात याची उत्सुकता असेल.

Web Title: maharashtra nagar parishad nagar panchayat local body election results 2025 live news updates check winners list in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.