महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून आज राज्यभरात मतदान पार पडले. उद्या निकाल हाती येणार आहेत. याआधी आज एक्झिट पोलचे आकडे समोर आले. सांगली महानगरपालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, यामुळे या महानगरपालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या ७८ जागांसाठी ३८१ उमेदवार रिंगणाक आहेत.
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), जनसुराज्य, शिंदेसेना स्वबळावर लढत आहेत. तर काँग्रेस -राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने आघाडी केली होती. एक्झिट पोलनुसार भाजपने सरशी घेतल्याचे दिसत आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलच्या अंदाडानुसार, ३८ जागा भाजपाला मिळण्याचा अंदाज दिला आहे. दुसऱ्या नंबरवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १० जागा मिळण्याची शक्यता आहे.
सोलापुरात कोण मारणार बाजी?
यावेळी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेससह, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीने ताकद लावली होती. पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंना जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये भाजप ६२, शिंदेसेना १५, अजित पवारांची एनसीपी ०४, इतर ४, काँग्रेस १२, ठाकरेसेना २, शरद पवार एनसीपी १, एमआय़एम १ असा निकाल येण्याचा अंदाज आहे.
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
नाशिक महानगर पालिकेसाठी आज मतदान पार पडले. आता सर्वांच्या नजरा या उद्या येणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत. या आधी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. नाशिकमध्ये शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष असणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
साम टीव्हीचा एक्झिट पोलनुसार शिंदेसेनेला ५५ तर भाजपला ५२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला ५, ठाकरेसेनेला ५, शरद पवार राष्ट्रवादीला १, मनसेला २ आणि इतरांना १ जागा मिळू शकतात.
Web Summary : Exit polls predict BJP gains in Sangli and Solapur municipal elections. Praniti Shinde may face setback. Shinde Sena projected to lead in Nashik.
Web Summary : एग्जिट पोल के अनुसार सांगली और सोलापुर नगर निगम चुनावों में भाजपा को बढ़त। प्रणीति शिंदे को झटका लग सकता है। नासिक में शिंदे सेना के नेतृत्व की संभावना।