शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अंबादास दानवेंना दिलासा, उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाबाबत महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 15:16 IST

Ambadas Danve : गुरुवारी अंबादास दानवे यांच्या निलंबनावर विधान परिषदेत चर्चा झाली. 

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. अंबादास दानवे यांच्या निलंबनात दोन दिवसांची कपात करण्यात आली आहे. उद्यापासून अंबादास दानवे सभागृहात दिसणार आहेत. गुरुवारी अंबादास दानवे यांच्या निलंबनावर विधान परिषदेत चर्चा झाली. 

अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या कारवाई संदर्भात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत प्रस्ताव मांडला. अंबादास दानवे यांच्या निलंबन कालावधीत कपात करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवल्यानंतर सर्वांनी एकमताने मंजूर केला. त्यामुळे आता अंबादास दानवे यांना दिलासा मिळाला असून ते उद्यापासून म्हणजेच शुक्रवारपासून सभागृहात उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोमवारी (१ जुलै) विधान परिषदेत उमटल्याचे पाहायला मिळाले होते. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी राहुल गांधींविरोधात सुमोटो प्रस्ताव मांडला तर प्रसाद लाड हेही आक्रमक झाले. यादरम्यान, अंबादास दानवे यांना प्रसाद लाड यांनी हातवारे करत थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंबादास दानवे आक्रमक झाले आणि त्यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली.

विधान परिषदेत प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले होते. तसेच, निलंबनाच्या कालावधीत त्यांना विधान परिषदेच्या परिसरात बंदी घालण्यात आली होती. या निलंबनाच्या कारवाईनंतर अंबादास दानवे यांनी 3 जुलै रोजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहित दिलगिरी व्यक्त केली होती. 

अंबादास दानवे काय म्हणाले?निलंबन कारवाई मागे घेतल्यानंतर अंबादास दानवे म्हणाले, "निलंबन मागे घेण्यात आले. त्याला उशीर झाला. हा निलंबनाचा निर्णय मागे घेऊन खूप काही असं वेगळं त्यांनी केलं असं नाही. मी दिलगिरी व्यक्त केली होतीस त्यानंतर त्यांनी निलंबन मागे घ्यायला हवं होतं. तरी त्यांनी तीन दिवस यामध्ये घेतले. उद्यापासून मी सभागृहात जाईन, तसेही आता चार ते पाच दिवस   उरले आहेत. उद्यापासून मी त्याच आक्रमकतेने  विरोधी पक्षाची भूमिका मांडत राहणार आहे."

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेVidhan Parishadविधान परिषदNeelam gorheनीलम गो-हेPrasad Ladप्रसाद लाडchandrahar patilचंद्रहार पाटील