18 Feb, 26 10:42 PM
इतक्या मोठ्या लोकांना अंगावर घेतोय.. रोहित पवारांची पत्नी काय म्हणाली?
18 Feb, 26 10:42 PM
रोहित पवार म्हणतात याचा अर्थ त्यात तथ्य आहे; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
18 Feb, 26 10:41 PM
मुंबई मनपा बेस्ट अध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजप-शिवसेना युतीच्या नगरसेवकांनी वरळी ते कुलाबा बेस्ट बसने प्रवास केला.
18 Feb, 26 10:40 PM
पर्सनल लोन की FDवर कर्ज? कोणता आहे बेस्ट ऑप्शन? जाणून घ्या सविस्तरपणे..
18 Feb, 26 09:18 PM
पुण्यात हजारो कोटींची वनजमीन संगनमताने बिल्डरांच्या घशात: सेवानिवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई
पुण्यात हजारो कोटी रुपयांची जमीन वन विभागाच्या हद्दीत असताना काही अधिकाऱ्यांनी आणि राज्यकर्त्यांनी संगनमत करून ती बिल्डरांच्या घशात घातली होती. त्या प्रकरणात आम्ही स्पष्ट निर्णय दिला की ती जमीन पुन्हा वन विभागाकडे वर्ग करण्यात यावी आणि त्या ठिकाणी पुन्हा वृक्षारोपण करण्यात यावे, असे सेवानिवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटले आहे. कराड तालुक्यातील उंडाळे येथे थोर स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब उंडाळकर यांच्या ५२ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ४३ व्या माजी सैनिक मेळाव्यात देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांना ‘स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
18 Feb, 26 09:17 PM
पाकिस्तानच्या टीमसोबत भयंकर घडलं, कॅप्टन अहमद बट याने काय सांगितंल?
18 Feb, 26 09:16 PM
८वा वेतन आयोग कुणाला लागू होणार, केंद्र सरकारनं संसदेत काय दिलं स्पष्टीकरण?
18 Feb, 26 09:05 PM
चाकूहल्ला प्रकरणात चार आरोपींच्या मुसक्या आवळून घटनास्थळी फिरवले!
क्षुल्लक कारणावरून तंत्रनिकेतनच्या एका २१ वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूने वार करुन खून करणात आल्याची घटना साेमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली हाेती. यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या प्रमुख आराेपींसह चाैघांच्याही पाेलिस पथकांनी अवघ्या तासाभरात मुसक्या आवळल्या. त्यांना बुधवारी घटनास्थळ परिसरात फिरविण्यात आले. पाेलिसांनी नागरिकांच्या मनामध्ये निर्भय वातावरण तयार करण्यासाठी त्यांना आश्वस्त केले.
18 Feb, 26 09:01 PM
३० वर्षीय शेतकऱ्याची निर्घृण हत्या; डोक्यावर वार, मृतदेह नालीत फेकला
रामलिंग मुदगड (ता. निलंगा) शिवारात एका ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. गुलाब विलासराव खरोसे (वय ३०) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेने एकच खळबळ उडाली. लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दिवसाढवळ्या होणाऱ्या हाणामाऱ्या, चाकू आणि कोयता हल्ल्यांच्या सत्रात वाढ झाली आहे.
18 Feb, 26 08:28 PM
मीरारोडच्या चौकास टिपू सुलतान ऐवजी भाजपाने दिले अशफाकउल्ला खान यांचे नाव
मीरारोडच्या एका चौकाला दिलेले टिपू सुलतान यांचे नाव काढून टाकून भाजपने बुधवारच्या महासभेत अशफाकउल्ला खान यांचे नाव देण्याचा ठराव केला. यावेळी भाजपा आणि काँग्रेस नगरसेवकां मध्ये चांगलीच खडाजंगी झाली. भाजपा कडून पंतप्रधान राजीव गांधी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, महात्मा गांधी यांच्या वक्तव्यांचा उल्लेख केला असता काँग्रेसने देखील एप्सटिन फाईल, ट्रेड डील व मोदींवर बोलायचे का ? असा पलटवार केला.
18 Feb, 26 08:12 PM
बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या तक्रारी मात्र चिंतेचा विषय ठरत आहेत. केंद्राच्या खेळाडू डेटा पोर्टलचा प्रभावी वापर आणि राज्यातही तशीच ऑनलाईन प्रक्रिया राबवली, तर गैरप्रकारांना आळा बसेल का? महागड्या होत चाललेल्या क्रीडा क्षेत्रात स्पर्धा, संधी आणि नोकरी याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी संवाद साधला.
18 Feb, 26 08:11 PM
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे छगन भुजबळ यांच्या हस्ते अनावरण
धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे शिवजयंतीच्या पूर्व संधीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले असून या कार्यक्रमाला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल आदी उपस्थित होते.
18 Feb, 26 08:09 PM
कोल्हापुरात PWD मध्ये 70 कोटींचा घोटाळा? मनसेचा गंभीर आरोप
कोल्हापुरात सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित भ्रष्ट कारभार उघडकीस आणण्याचा प्रयत्न मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. शेंडा पार्क परिसरात करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप मनसैनिकांनी केला आहे. या परिसरातील इमारतींसाठी 136 कोटी रुपये, तर रस्त्यांसाठी 65 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या मंजूर कामांबाबत 136 प्रश्नांचे 100 पानी निवेदन मनसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. या कामांमध्ये 60 ते 70 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असण्याची शक्यता मनसैनिकांनी व्यक्त केली आहे.
18 Feb, 26 08:08 PM
मुस्लिमांचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारच्या निर्णयावर संताप
मुस्लिमांचे ५ टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुस्लिम समाजाला कमजोर करण्याची ही सरकारची पॉलिसी असल्याची टीका मुस्लिम नेत्यांनी केली आहे. मुस्लिम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर फडणवीस सरकारने आघाडी सरकारच्या काळात काढलेला जीआर रद्द केला आहे. त्यामुळे मुस्लिम नेत्यांकडून राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे.
18 Feb, 26 08:08 PM
शिवजयंतीपूर्वी संभाजीनगरची बाजारपेठ झेंड्यांनी सजली
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरमध्ये झेंड्यांनी संपूर्ण बाजारपेठ सजली आहे. शिवप्रेमी झेंडे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठ्या संख्येने येत असून उत्साहात खरेदी करत आहेत. सध्या “जाणता राजा” या नावाचे झेंडे विशेष मागणीत आहेत. वाहनांना झेंडे लावण्यासाठी चालक साधे (प्लेन) तसेच आकर्षक झेंडे खरेदी करत आहेत. झेंड्यांची किंमत १० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत आहे. सध्या झेंड्यांचे दरही वाढल्याचे शिवप्रेमींनी सांगितले आहे. प्रत्येक शिवभक्त आपल्या भावनेनुसार शिवजयंती साजरी करत असून कोणी लहान तर कोणी मोठे झेंडे खरेदी करत आहे.
18 Feb, 26 06:24 PM
मुंबई महापालिकेच्या समित्यांच्या निवडणुका बिनविरोध; ठाकरे गटाची माघार
मुंबई महापालिकेच्या विविध समित्यांच्या निवडणुकीतून ठाकरे गटाने माघार घेतली आहे. नवीन नगरसेवक असल्याने आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा न झाल्याने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
18 Feb, 26 03:16 PM
मुंबई पालिकेच्या सुधार समिती अध्यक्षपदासाठी शिंदेसेनेच्या संध्या दोशी यांचे नाव निश्चित
मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समिती अध्यक्षपदासाठी शिंदेसेनेच्या संध्या दोशी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यांना आज हा अर्ज भरला.
18 Feb, 26 03:11 PM
बॉलीवूड अभिनेत्रीच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना पिस्तुल पुरवणाऱ्याला अटक
अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी गँगस्टर महफूज उर्फ बॉबी कबुतर हा 'वाँटेड' होता. त्याने गोळीबार करणाऱ्यांना पिस्तुल पुरवली होती. गेल्या सात वर्षांपासून बॉबी कबुतर फरार होता. त्याला आज अटक करण्यात आली.
18 Feb, 26 02:16 PM
राज ठाकरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीमागे नेमकंं काय कारण आहे हे समजू शकले नाही. एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक असलेल्या उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे यांनी युती करून निवडणूक लढवली होती. महापालिका निवडणुकीत महायुतीविरोधात राज ठाकरे यांनी सूर आवळला होता. त्यामुळे या भेटीवर अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
18 Feb, 26 01:27 PM
मुंबई पालिका: बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी तृष्णा विश्वासराव यांचे नाव निश्चित
मुंबई: बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरायला बेस्ट बस प्रशासनाने प्रवास करून भाजपा शिंदेसेनेचे सर्व नगरसेवक बेस्ट भवन, कुलाबा येथे रवाना झाले. शिंदेसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांचे नाव बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी निश्चित झाले असून त्या अर्ज भरणार आहेत.
18 Feb, 26 01:12 PM
मुंबई महापालिका: स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्षपदी राजेश्री शिरवाडकर
मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपाचे प्रभाकर शिंदे यांचे नाव निश्चित झाले असून, ते अर्ज दाखल करणार आहेत. सभागृह नेते गणेश खणकर यांनी आज पक्ष कार्यालयात याबाबतची घोषणा केली. तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या राजेश्री शिरवाडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
18 Feb, 26 12:38 PM
...त्यामुळे माझ्या घरच्यांना चिंता; रोहित पवारांनी सांगितलं काय घडतंय?
माझे आई वडील, पत्नी, मुले आणि सासू सासरे यांच्या मनात एक भीती आहे. जर अजितदादांच्या बाबतीत जर काही घातपात झाला असेल तर त्यामागे मोठी शक्ती असू शकते. मोठ्या शक्तीविरोधात तू बोलतोय त्यामुळे आम्हाला ही रिस्क वाटत आहे. मलाही यात रिस्क आहे ठाऊक आहे. परंतु कितीही रिस्क असली तरी कुणाला तरी यासाठी लढावे लागेल. मी लढतोय. त्यामुळे कुटुंब भावनिकदृष्ट्या खचले आहे. जोपर्यंत अजितदादांच्या अपघाताचा विषय मी तडीस नेत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. जी काही रिस्क असेल ते माझे कार्यकर्ते, माझी खासगी सुरक्षा व्यवस्था लक्ष देत आहे. माहिती कुठे लपवली आहे ते माझ्या घरी, कार्यालयात नसते. ती कुठे लपवलेली असते ते माझ्या जवळच्यांनाही माहिती नसते. त्यामुळे आम्ही हिंमतीने लढा देतोय. अजितदादांचा घात की अपघात याचा निष्कर्ष येईपर्यंत आम्ही लढत राहू - रोहित पवार
18 Feb, 26 11:18 AM
महाराष्ट्रातील कोणत्या राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपणार?
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. सात खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपत आहे.
मार्च २०२० या सात जागांसाठी निवडणूक झाली होती. यात तत्कालीन महाविकास आघाडीचे चार, तर भाजपाचे तीन खासदार बिनविरोध निवडून गेले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, फौजिया खान, शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसकडून राजीव सातव (सातव यांच्या निधनानंतर रजनी पाटील या निवडून गेल्या.), तर भाजपाकडून भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले हे निवडून गेले होते. त्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपत असून, १६ मार्च रोजी मतदान होऊन निकाल जाहीर होईल.
18 Feb, 26 11:38 AM
भारताबाहेरील २ यंत्रणांची मदत घ्यावी, विमान अपघाताबाबत रोहित पवारांची मागणी
अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी सुनेत्रा पवार यांच्यासह इतर नेत्यांनी केली. माझ्या मनात जी शंका आहे ती त्यांच्याही मनात आहे हे दिसून आले. २० दिवसांत तपास ज्यापद्धतीने व्हायला हवा तसा झाला नाही. कागदांमध्ये हेराफेरी झाल्याची शक्यता आहे. AAIB, DGCA, सीबीआय, सीआयडी यासारख्या संस्था तपास करतील. त्याशिवाय भारताबाहेरील २ तपास यंत्रणांची मदत घ्यावे. या सगळ्यांवर नियंत्रण ठेवणारी एक समिती असायला हवी. त्यात देशाचे विरोधी पक्षनेते, माजी न्यायाधीश, तज्ज्ञ आणि कुटुंबातील काही व्यक्ती घ्या. पारदर्शक तपास व्हावा अशी आमची मागणी आहे. जर खरेच सत्ता तुमच्याकडे आहे तर VSR कंपनीला टाळे लावण्याची धमक सत्तेतील लोकांकडून दिसावी ही आमची अपेक्षा आहे. अजून प्राथमिक रिपोर्ट आला नाही. विमान कंपनीचा मालकच अमेरिकेत जाऊन बसला असेल तर कारवाई कशी होईल? माझ्याकडे आणखी बरीच माहिती आहे. आम्ही इतकी माहिती आणल्यानंतर सरकारही सखोल चौकशी करेल अशी अपेक्षा आहे - रोहित पवार
18 Feb, 26 11:25 AM
विमान कोसळल्यानंतर इतके स्फोट का झाले? रोहित पवारांनी केला नवीन गौप्यस्फोट
अजित पवारांचा ज्या विमान अपघातात मृत्यू झाला. त्या विमान अपघाताबद्दल रोहित पवार यांनी नवीन खुलासा केला.
मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार म्हणाले की, 'अजितदादांच्या विमान अपघाताचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यात अपघातानंतर मोठे स्फोट झाल्याचे दिसत आहेत. विमान पडल्यानंतर काही वेळाच्या अंतराने स्फोट झाले होते. त्या विमानात अधिकचे इंधन होते. विमानाच्या पंखांमध्ये आणि आतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यात आले होते. त्यामुळे वारंवार स्फोट झाले", असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
18 Feb, 26 10:27 AM
राज्यातील सात राज्यसभा जागांसाठी निवडणुका जाहीर, १६ मार्चला मतदान!
राज्यातील सात राज्यसभा जागांसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहे. या जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार आहे.
18 Feb, 26 10:10 AM
भिवंडीत ट्विस्ट! महापौरपदावरून शिवसेना-भाजपात रस्सीखेच
भिवंडी महापालिका महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील आणि भाजपामध्ये झालेल्या वादानंतर विलास पाटील यांना शिवसेनेने जवळ करत महापौर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न सुरू केल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेना आणि भाजपामध्ये शर्यत लागली असून, भाजपामधील नाराज नगरसेवकांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. भाजपाचे अनेक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचेही सांगितले जाते.
18 Feb, 26 10:04 AM
गोपीचंद पडळकर यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली
भिगवणमध्ये बाजारपेठेतून एका २१ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. मुलीचा भाऊ आणि आई यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून आरोपींनी मुलीला उचलून नेले. या घटनेनंतर इंदापूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांची सभा होणार होती. त्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली, मात्र पोलिसांनी पडळकरांच्या सभेला परवानगी नाकारली आहे.
18 Feb, 26 09:31 AM
फडणवीस सरकारचा निर्णय स्वागतार्ह; तुषार भोसलेंचे मुस्लीम आरक्षण रद्द केल्यानंतर विधान
राज्य सरकारने मुस्लीम समाजाला दिले जाणारे पाच टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेशही काढण्यात आला असून, भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी यांचे स्वागत केले आहे.
18 Feb, 26 09:30 AM
मुस्लीम समाजाला मोठा धक्का, राज्य सरकारकडून ५ टक्के आरक्षण रद्द
मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के एसबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील जुने शासन निर्णय आणि परिपत्रके तातडीने रद्द करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
18 Feb, 26 09:09 AM
अजित पवार विमान अपघात प्रकरण: पक्षाकडून सीबीआय चौकशीची मागणी
अजित पवार विमान अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून केली जात आहे. याप्रकरणी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.
18 Feb, 26 08:49 AM
अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात, रोहित पवार कोणता बॉम्ब फोडणार?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. आता ब्लॅक बॉक्सचे अपघातात नुकसान झाल्याची माहिती समोर आल्यानंतर संशयाचे धुके अधिक गडद होऊ लागले आहे. यावर रोहित पवारांनी आज महत्त्वाची माहिती देणार असल्याचे म्हटले आहे.
रोहित पवारांनी मंगळवारी (१८ फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना याबद्दल शंका उपस्थित केल्या होत्या. "विमानातील ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बस्फोटापासून सुरक्षित आहे. पण राजकारण्यांपासून सुरक्षित नाही. आता याच्यामध्ये काय राजकारण चाललं आहे, हे आपल्याला बघावं लागेल", असे रोहित पवार म्हणाले.
"उद्या अधिक खोलात जाऊन या घटनेवेळी काय घडलं असावं, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आल्या आहेत, त्या आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत", अशी माहिती रोहित पवार यांनी दिली होती.