शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha election results 2024 : सहानुभूतीच्या लाटेने महाआघाडीला  मिळाले बळ; बारामती शरद पवारांचीच

By संजय आवटे | Updated: June 5, 2024 12:08 IST

Maharashtra Lok Sabha election results 2024: अजित पवार यांच्यापुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला असून, बारामती शरद पवारांची असल्याचे सिद्ध झाले आहे. 

- संजय आवटे(संपादक, पुणे)

‘एक्झिट पोल’च्या सर्व आकड्यांना खोटे ठरवणारे निकाल देशभरात बघायला मिळाले. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, शिरूर, मावळ, नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघांत अत्यंत अटीतटीच्या लढतीत सहापैकी चार मतदारसंघांत महाआघाडीचा करिष्मा दिसला. पुणे आणि मावळ लोकसभा मतदारसंघांत महायुतीचा विजय झाला. पक्षफुटीमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा महाआघाडीच्या उमेदवारांना मिळाला. तर, पुणे आणि मावळ महायुतीने राखले असले तरी गेल्या निवडणुकीपेक्षा मताधिक्यात घट झाली आहे. अजित पवारांचे दोन्ही उमेदवार भाजपची आणि शिंदेसेनेची साथ न मिळाल्यामुळे पराभूत झाले. एकसंध महाविकास आघाडी आणि विखुरलेली महायुती असा हा सामना होता. 

पुणे : पुण्यात रवींद्र धंगेकर यांनी चांगली लढत देऊन भाजपच्या या बालेकिल्ल्याला धडक दिली. मात्र, निवडणूक व्यवस्थापन आणि काँग्रेसमधील कुरबुरींचा फटका त्यांना बसला. मुरलीधर मोहोळ यांची  आणि भाजपची यंत्रणा सोबत चालल्याचा फायदा झाला. महापौर म्हणून तयार झालेल्या प्रतिमेमुळेही मोहोळ आघाडीवर राहिले. 

बारामती : सहानुभूतीमुळे लोकसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघ सुप्रिया यांच्या पाठीशी राहिले. भारतीय जनता पक्षाने अजित पवारांचे काम केले नाही. भाजपचा प्रभाव असलेल्या भागातही सुप्रिया चालल्या. 

अहमदनगर : विखे कुटुंबीयांचे वाढते महत्त्व कमी करण्यासाठी भाजप मैदानावर फार ॲक्टिव्ह नसल्याचे सुरुवातीपासूनच बोलले गेले. शेतकऱ्यांमधील असंतोष आणि  सहानुभूतीचा फायदा नीलेश लंके यांना मिळाला. 

शिरूर : शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे पक्षांतर मतदारांना रुचले नाही. डॉ. अमोल कोल्हे यांना सहानुभूतीचा फायदा झाला. मावळ : श्रीरंग बारणे यांना भाजपची साथ मिळाल्यामुळे विजय शक्य झाला. संजोग वाघिरे यांना सहानुभूती मतात परावर्तित करता आली नाही. 

शिर्डी : सदाशिव लोखंडे यांचा कमी झालेला जनसंपर्क आणि स्थानिक समीकरणांचा फायदा भाऊसाहेब वाघचौरे यांना झाला.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवार