शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha election results 2024 : महाविकास आघाडीचा वाजला डंका; महायुतीला बसला फटका

By वसंत भोसले | Updated: June 5, 2024 11:55 IST

Maharashtra Lok Sabha election results 2024: सांगलीत भाजपमधील गटबाजी, महाआघाडीतील नाराजी आणि वसंतदादा प्रेमी जनता यांचा लाभ उठवीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी निवडणूक जिंकली.

- वसंत भाेसलेसंपादक, काेल्हापूर

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रात सहापैकी चार जागा जिंकून महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार फटका दिला आहे. भाजपच्या विद्यमान तिन्ही उमेदवारांचा पराभव झाला. शिंदेसेनेला एक आणि उदयनराजे यांच्या रुपाने भाजपला साताऱ्याची जागा मिळाली.

कोल्हापुरात महाविकासची एकजूट, सतेज पाटील यांची आक्रमक प्रचार यंत्रणा व शाहू महाराज यांच्या विषयी असलेल्या सहानभुतीने  काँग्रेसने बाजी मारली. साताऱ्यात उदयनराजे व शशिकांत शिंदे ही लढत चुरशीची झाली. सातारा, जावळी, वाई, कोरेगाव या परिसरातील मताधिक्यावर शेवटच्या फेऱ्यात भाजपचे उदयनराजे विजयी झाले.

सोलापूरला माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या तीन महिन्यापासून पायाला भिंगरी लावून फिरत होत्या. शिंदे आणि पवार यांच्या जोडण्यामुळे भाजपने प्रतिष्ठा पणाला लावूनही प्रणिती शिंदे विजयी झाल्या. माढा मतदारसंघात शरद पवार यांनी आपल्या प्रदीर्घ काळाच्या राजकारणाचा वापर करीत अकलूजच्या मोहिते-पाटील यांच्या घराण्यातील उमेदवार काढला. त्यामुळेच धैर्यशिल मोहिते-पाटील यांचा विजय सोपा झाला.

हातकणंगलेत ऐनवेळी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी महाआघाडीत न येण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना तर फटका बसलाच पण उद्धवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील यांनाही तयारीने उतरता आले नाही. शिंदेसेनेचे धैर्यशील माने यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवस मतदारसंघात तळ ठोकून बळ दिल्याने शेवटच्या फेऱ्यात निवडून आले. त्यांचा हा सलग दुसरा विजय आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल