शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha election results 2024: उमेदवार निवडीचा गाेंधळ, समन्वयाच्या अभावामुळे महायुतीचा टक्का घसरला 

By विलास बारी | Updated: June 5, 2024 12:13 IST

Maharashtra Lok Sabha election results 2024: उत्तर महाराष्ट्र हा शिवसेना-भाजप महायुतीचा बालेकिल्ला मानला जात असताना या निवडणुकीवेळी महायुतीतील गोंधळाचा आणि परस्परांमध्ये असलेल्या समन्वयाचा अभाव यामुळे महाविकास आघाडीने लाभ उठविला. 

- विलास बारीवरिष्ठ उपसंपादक, जळगाव

जळगाव : कांदा निर्यादबंदी निर्णय, शेतमालाचा हमी भाव, महायुतीतील उमेदवार निवडीचा गोंधळ तसेच मराठा, दलित व मुस्लिम मतदारांची नाराजी यामुळे उत्तर महाराष्ट्रात महायुतीला जोरदार फटका बसला यावेळी महायुतीला केवळ दोन जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीने चार जागांवर विजय मिळवित जोरदार मुसंडी मारली आहे. जळगाव व रावेर मतदार संघात भाजपने विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. याठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडीबाबतच्या गोंधळाचा फटका बसला. तसेच उद्धवसेना व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडील कार्यकर्त्यांची फळी व नेतृत्वाचा अभाव जाणवला.

नंदुरबारमध्ये  हिना गावित यांच्याबाबत महायुतीच्या नेत्यांची नाराजी तसेच घराणेशाहीचा फटका बसला.  काॅंग्रेस उमेदवार गाेवाल पाडवी हे नवखे असल्याने सहज पराभव करता येईल हा अतिआत्मविश्वास घातक ठरला. धुळ्यात काॅंग्रेसच्या शोभा बच्छाव आणि  भाजपचे उमेदवार डाॅ.सुभाष भामरे यांच्यात लढत झाली. डाॅ.भामरे यांना मालेगाव मध्य व  बागलानमध्ये मतदारांच्या नाराजीचा फटका बसला. अटीतटीच्या या लढतीत काॅंग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा विजय झाला. 

महायुतीतील गोंधळाचा फायदा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्करराव भगरे यांना मिळाला. याठिकाणी केंद्रीय मंत्री डाॅ.भारती पवार यांचा पराभव झाला. नाशिकमध्ये शिंदेसेनेचे हेमंत गोडसे यांना दलित, मुस्लिम व ओबीसी मतदारांच्या नाराजीचा फटका बसला. १० वर्ष खासदार असताना अपेक्षित कामे न झाल्यामुळे मतदारांची नाराजी होतीच. याठिकाणी उद्धवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे विजयी  झाले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल