शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपासारखं धाडसं शिवसेनेनं दाखवलं असतं तर चित्र वेगळं असतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 11:20 IST

शिवसेनेचे हे दिग्गज उमेदवार गेले अनेक वर्ष आपले गड सांभाळून होते. निवडणुकीपूर्वी शिवसेनेने भाजपासोबत एकत्र येत युती केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत हे उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिवसेनेला होता.

मुंबई - गुरुवारी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर देशातील जनतेने पुन्हा एकदा मोदी सरकारला संधी दिल्याचं पाहायला मिळालं. राज्यातही शिवसेना-भाजपा युतीला अभूतपूर्व यश मिळालं. मात्र शिवसेनेतील अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. चंद्रकांत खैरे, अनंत गीते, शिवाजी आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ अशा दिग्गजांना मोदीलाटेतही पराभूत व्हावं लागलं. 

शिवसेनेचे हे दिग्गज उमेदवार गेले अनेक वर्ष आपले गड सांभाळून होते. निवडणुकीपूर्वी शिवसेनेने भाजपासोबत एकत्र येत युती केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत हे उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिवसेनेला होता. मात्र प्रत्यक्ष निकालात चित्र पालटलं. शिवसेनेने निवडणुकीच्या निकालात आपल्या जागा राखल्या. मागील लोकसभा निकालात शिवसेनेचे 18 खासदार जिंकले होते यंदाच्या निकालातही शिवसेनेचे 18 खासदार विजयी झाले. मात्र ज्या नेत्यांबद्दल शिवसेनेला विश्वास होतो त्याच प्रस्थापित नेत्यांना जनतेने नाकारलं. या पराभवाचं चिंतन शिवसेनेला नक्की करावं लागणार आहे. 

अमरावतीत आनंदराव अडसूळ, शिरुरमध्ये शिवाजी आढळराव, रायगड अनंत गीते, औरंगाबाद चंद्रकांत खैरे गेली अनेक वर्ष मतदारसंघाचं नेतृत्व करत होते. यंदाच्या निवडणुकीत ज्याप्रकारे भाजपाने आपल्या विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्याचं धाडस दाखवलं तसं शिवसेनेने केलं असतं तर बहुदा राज्यातील निकालात शिवसेनेच्या खासदारांचे आकडे वाढले असते असचं म्हणावं लागेल. भाजपाने राज्यात सोलापूरचे शरद बनसोडे, लातूरचे सुनील गायकवाड, अहमदनगरचे दिलीप गांधी, पुण्याचे अनिल शिरोळे, ईशान्य मुंबईचे किरीट सोमय्या, दिंडोरी हरिशचंद्र चव्हाण, जळगावचे ए.टी नाना पाटील  या विद्यमान खासदारांचा पत्ता कापला आणि या जागांवर नवीन उमेदवारांना संधी दिली. याठिकाणी भाजपाने पुन्हा विजय मिळविला असून शिवसेनेला हे जमलं नाही. 

शिरुरमध्ये शिवाजी आढळराव पाटील, रायगडमध्ये अनंत गीते, अमरावतीत आनंदराव अडसूळ, औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात जनमानसात तसेच पक्षांतर्गत नाराजी होती. शिरुर लोकसभेचं तिकीट द्यावं यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली. मात्र तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. अखेर शिरुर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रस्थापित शिवाजी आढळराव पाटील यांना धक्का देत शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावला. निकालांवरुन स्पष्ट होतं की, शिवसेनेच्या प्रस्थापितांना जनतेने नाकारलं. त्यामुळे निवडणुकीपूर्वी जर उमेदवार बदलण्यावर शिवसेनेकडून चिंतन झालं असतं तर शिवसेनेच्या खासदारांची संख्या वाढलेली पाहायला मिळाली असती.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालShiv SenaशिवसेनाBJPभाजपा