शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : ‘वंचित’ला तब्बल ८ मतदारसंघांमध्ये विजयी मताधिक्यापेक्षाही जास्त मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 08:11 IST

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : अकोला मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मात्र, अनामत रक्कम वाचली. 

मुंबई : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच्या लढाईत स्वत:चे अस्तित्व टिकविले; परंतु एकाही ठिकाणी त्यांना यश आले नाही. मात्र, ८ मतदारसंघांमध्ये विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा अधिक मते वंचितच्या उमेदवारांना मिळाली. वंचितच्या ३८ उमेदवारांपैकी ॲड. आंबेडकर वगळता ३७ जणांची अनामत रक्कम जप्त झाली.

वंचितने विजयाच्या मताधिक्यापेक्षा जास्त मते घेतली तिथे अनुप धोत्रे (भाजप), नागेश आष्टीकर (उद्धवसेना), प्रतापराव जाधव (शिंदेसेना), वसंतराव चव्हाण (काँग्रेस), भाऊसाहेब वाकचौरे  (उद्धवसेना), बजरंग सोनवणे (शरद पवार गट), धैर्यशील माने (शिंदेसेना), रवींद्र वायकर (शिंदेसेना) हे निवडून आले. याचा अर्थ महायुती व मविआचे प्रत्येकी ४ उमेदवार निवडून आले.

या मतदारसंघांमध्ये वंचितच्या उमेदवाराची अनामत झाली जप्त अहमदनगर, औरंगाबाद, बीड, भंडारा-गोंदिया, बुलडाणा, चंद्रपूर, दिंडोरी, गडचिरोली-चिमूर, हातकणंगले, हिंगोली, जळगाव, जालना, कल्याण, लातूर, माढा, मावळ, उत्तर मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे रायगड, रामटेक, रत्नागिरी, रावेर, सातारा, शिर्डी, शिरूर, वर्धा या मतदारसंघांमधील वंचितच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. अकोला मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मात्र, अनामत रक्कम वाचली. मागील निवडणुकीत वंचितने ४८ पैकी ४७ जागा लढवित ६.९२ टक्के इतकी मते मिळविली होती. 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल