शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
3
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
4
इंडिगोची 'साडेसाती' संपता संपेना... आजच्या दिवशी तब्बल २०० विमान उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
5
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
6
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
7
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
8
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
9
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
10
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
11
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
12
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
13
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
14
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
15
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
16
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
17
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; म्हणे, मुलीचा चेहरा प्रियकराला दाखवायचाय!
18
शेअर बाजारात आधी घसरण मग सावरला; सेन्सेक्समध्ये ३५ अंकांची तेजी, निफ्टी २५,९९५ च्या पुढे
19
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
20
"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "मी पुन्हा येईन... लोकांची घरं, पक्ष फोडून येईन असं गळा फोडून सांगणारे आता..."; राऊतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 09:49 IST

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Sanjay Raut And Devendra Fadnavis : संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपाची महाराष्ट्रात झालेल्या पिछाडीची मी जबाबदारी स्वीकारतो. आपण स्वत: कुठेतरी कमी पडलो. ती कमतरता भरून काढण्यासाठी व विधानसभेकरिता पूर्णवेळ काम करायचे असून, मला सरकारमधून मुक्त करावे, अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचं सांगत उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी दर्शविली आहे. 

फडणवीस यांनी असा कोणताही निर्णय घेऊ नये, यासाठी भाजप नेत्यांकडून त्यांना गळ घालती जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पराभवाची जबाबदारी सामूहिक असल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. "महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "मी पुन्हा येईन… पुन्हा येईन..  लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन असे गळा फ़ोडून सांगणारे आता : मला जाऊदे ना घरी, वाजले की बारा, अशी रेकॉर्ड लावत आहेत. छान... महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत. जय महाराष्ट्र!" असं राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात पराभवावर चर्चा करण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, "विधानसभा निवडणुकीसाठी पक्षामध्ये पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी, ज्यामुळे राहिलेल्या कमतरता पूर्ण करण्यासाठी मला वेळ देता येईल. बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही करायचे आहे, ती आमची टीम करेल. त्यांच्यासोबत मी असणार आहे. यासंबंधी पक्षातील वरिष्ठांशी मी भेटणार आहे."

संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या प्रचाराचा जनमानसावर मोठा परिणाम झाला. मराठा आरक्षणाबाबतच्या मुद्द्याचा आम्हाला फटका बसला. कांदाप्रश्नाचाही प्रचार झाला. आम्ही मराठा आरक्षण दिल्यानंतरही त्याबाबत विरोधकांच्या प्रचाराला आम्ही उत्तर देऊ शकलो नसल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा