शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: राज्यात थेट १५ लढतीत काँग्रेसची भाजपवर ११ जागांवर मात, शिंदेसेना-उद्धवसेना १३ जागांवर लढाई

By यदू जोशी | Updated: June 5, 2024 07:06 IST

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भात काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: मुंबई : काँग्रेस आणि भाजप यांच्यात १५ जागांवर लढत झाली. त्यातील उत्तर मध्य मुंबई, नंदुरबार, जालना, लातूर, नांदेड, अमरावती, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, धुळे आणि सोलापूर या ११ जागांवर काँग्रेसने भाजपला मात दिली. तर उत्तर मुंबई, अकोला, नागपूर आणि पुणे या चार जागांवर भाजपची सरशी झाली आहे. 

भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भात काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली. तेथे काँग्रेसने जिंकलेल्या पाच पैकी चार जागांवर भाजपला धूळ चारली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा-गोंदिया या गृहजिल्ह्यात नवखे डॉ. प्रशांत पडोळे यांनी विजय मिळवला. शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना झाला.

दोघांचे पक्ष १३ मतदारसंघांमध्ये आमनेसामने होते. सगळ्यांचेच लक्ष लागलेला हा निवडणुकीचा सामना  मुख्यमंत्री शिंदे यांनी सात विरुद्ध सहा असा जिंकला. ठाकरे यांचे ९ खासदार निवडून आले असून, शिंदेंचे सात खासदार जिंकले आहेत. उद्धवसेनेेने २१ जागा लढविल्या, तर शिंदेसेनेने १५ जागा लढविल्या. ठाकरेंच्या ठाण्यातील वर्चस्वाला शिंदेंनी जोरदार धक्का देत तेथील दोन्ही जागा जिंकल्या. 

पुतण्यावर काकाच भारीबंड करत भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का बसला. त्यांना महायुतीत चार जागा मिळाल्या होत्या, पण एकच रायगडची जागा जिंकली. बारामती आणि शिरूरमध्ये काका-पुतण्यांचे पक्ष आमनेसामने होते. दोन्ही जागा काकांच्या म्हणजे शरद पवारांच्या पक्षाने जिंकल्या. बारामती आपलीच हे शरद पवार यांनी सिद्ध केले. 

अजित पवार यांनी चार जागा लढून एकच म्हणजे २५ टक्के जागा जिंकल्या. मात्र, शरद पवार यांनी महाविकास आघाडीत १० जागा लढल्या आणि ६ म्हणजे ६० टक्के जागा जिंकल्या. विजयाच्या टक्केवारीतही काका हे पुतण्यापेक्षा सरस ठरले. बारामतीत सुप्रिया सुळे पराभूत झाल्या तर शरद पवार यांच्या राजकीय अस्तित्वावर मोठे प्रश्नचिन्ह लागेल, असे म्हटले जात होते. मुलीच्या विजयाने पवार यांनी टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. सुनील तटकरे यांच्या विजयात त्यांच्या पक्षापेक्षा स्वत:च्या प्रतिमेचा व जनसंपर्काचा तसेच मित्रपक्षांनी केलेल्या मदतीचा वाटा अधिक आहे. 

वेळेवर उमेदवारीचा शिंदेंना फटका शिंदेसेनेच्या ज्या जागांचे उमेदवार वेळेवर जाहीर झाले, तिथे त्यांचा पराभव झाला.राजश्री पाटील (यवतमाळ-वाशिम), यामिनी जाधव (दक्षिण मुंबई), हेमंत गोडसे (नाशिक) यांचा त्यात समावेश आहे. नरेश म्हस्के (ठाणे) जिंकले, तर रवींद्र वायकर (उत्तर-पश्चिम मुंबई) यांनी निसटता विजय मिळविला.

टक्केवारीतही शिंदेच पुढे यशाच्या टक्केवारीतही ठाकरे पुढे आहेत. त्यांनी २१ जागा लढल्या आणि ९ जागांवर म्हणजे ४३ टक्के जागांवर आघाडी घेतली, तर शिंदेंनी १५ जागा लढून ७ म्हणजे ४७ टक्के जागा जिंकल्या.  

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा