शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: भाजपने ‘गड’ गमावला; काॅंग्रेसचे दिमाखात झाले कमबॅक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 12:17 IST

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: २०१४ मध्ये दहा, २०१९ मध्ये ९ जागा जिंकून विदर्भाला भाजपने आपला गड केला. मात्र, यावेळी काॅंग्रेसने दिमाखात कमबॅक करतांना महाविकास आघाडीच्या मदतीने शिंदेसेनेलाही एका जागेवर राेखत आपला झेंडा फडकविला..

- राजेश शेगाेकार(वृत्त संपादक, नागपूर)

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या तीन सभा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे हाेमपीच तसेच गेल्या दाेन निवडणुकीत भाजपने मिळविलेला एक हाती विजय अशी पृष्ठभूमी असतानाही विदर्भात भाजपला आपला गड शाबूत ठेवता आला नाही. काॅंग्रेसने जाेरदार मुसंडी मारत रामटेक, गडचिराेली, चंद्रपूर, अमरावती, भंडारा गाेंदिया या पाच तर उद्धवसेनेने यवतमाळ अन् शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने वर्धा मतदारसंघात विजय मिळवला. नागपुरातून नितिन गडकरी, अकोल्यातून अनुप धाेत्रे हे भाजपचे उमेदवार निवडून आले. बुलढाण्यात शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव विजयी झाले आहेत. 

शेतकरी आत्महत्या, कापूस, सोयाबीन, धान या सारख्या शेतमालाचे पडलेले भाव, महागाई, बेरोजगारीबाबत असलेला असंतोष व संविधान धोक्यात या भावनांना काॅंग्रेसने हात घातला. तो मतदारांना भावल्याचे निकालावरुन स्पष्ट दिसत आहे.  नागपुरात भाजपचे हेवीवेट नेते नितिन गडकरी यांना मताधिक्य मिळविण्यासाठी काॅंग्रेसच्या विकास ठाकरे यांनी चांगलेच झुंजविले, रामटेकमध्ये काॅंग्रेसचे आमदार राजु पारवे यांना शिंदेसेनेत प्रवेश देत उमेदवारी देण्याची भाजपने खेळी केली. दुसरीकडे  काॅंग्रेसच्या घाेषीत उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्र अवैध झाल्याने ऐनवेळी काॅंग्रसने त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी द्यावी लागली. अशा गाेंधळातही माेदींची सभा, मुख्यमंत्री  शिंदे यांनी मतदारसंघात ठाेकलेला तळही मतदारांना प्रभावित करू शकला नाही, हेच काॅंग्रेसला मिळालेल्या यशावरून दिसत आहे.  

 गडचिराेलीमध्ये भाजप खासदार अशाेक नेते यांची हॅटट्रिक काॅंग्रेसचे डाॅ. नामदेव किरसान यांनी राेखली. विराेधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली हाेती. वर्धा मतदारसंघात काॅंग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना एनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश देत शरद पवारांनी उमेदवारी दिली. काळे यांनी भाजपचे खा. रामदास तडस यांना पराभूत करत विदर्भात राष्ट्रवादीचे खाते उघडले. भंडारा गाेंदियात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांची प्रतिष्ठा पणाला लागली हाेती. भाजप खासदार डाॅ. सुनील मेंढे यांच्या विराेधात डाॅ. प्रशांत पडाेळे अशी चुरशीची लढत होऊन पडाेळे यांनी विजयश्री खेचून घेतली. येथे राहूल गांधीची सभा झाली हाेती, हे विशेष. विदर्भात वंचित बहुजन आघाडीचा असलेला प्रभाव या वेळी निर्णायक ठरला नसल्याचे उमेदवारांना मिळालेल्या मतांवरुन स्पष्ट होते.

बुलढाण्यात शिंदेसेनाचमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ, रामटेकच्या खासदारांना नाकारलेली उमेदवारी महागात पडली, केवळ बुलढाण्यात  प्रतापराव जाधव यांनी विजय मिळवित शिंदे सेनेचा झेंडा कायम ठेवला त्यांनी उद्धवसेनेचे नरेंद्र खेडेकर यांना मात दिली.

जातीय समीकरण काॅंग्रेसच्या पथ्यावरचंद्रपुरात काॅंग्रेसच्या प्रतिभा धानाेरकर यांनी भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दाेन लाखांवर मतांनी पराभूत केले. येथे तिसरा प्रभावी उमेदवार नसणे व जातीय समीकरण काॅंग्रेसच्या पथ्यावर पडले अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणा यांना स्थानिक भाजप नेत्यांचा विराेध, मित्रपक्ष प्रहारनेही विराेधात दिलेला उमेदवार भाेवला. येथे एकसंघ काॅंग्रेस बळवंत वानखडेंच्या विजयात महत्त्वाची ठरली. यवतमाळमध्ये राजश्री पाटील यांना ऐनवेळी मिळालेली उमेदवारी, उद्धवसेनेचे संजय देशमुख यांच्या फायद्याची ठरली.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४