शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
2
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
3
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
4
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
5
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
6
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
7
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
8
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
9
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
10
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
11
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
12
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
13
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
14
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
15
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
16
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
17
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
18
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
19
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
20
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : पक्षांतर करून महायुतीतर्फे लढलेले एक सोडून बाकी सगळेच पडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 07:46 IST

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: पक्ष बदलून लढल्याचा काहींना फायदा तर काहींना तोटा

Maharashtra Lok Sabha Election Result 2024:  मुंबई : पक्षांतर करून लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांच्या नशिबी संमिश्र यश आले. पक्षांतरानंतर महायुतीतर्फे लढलेले सर्व उमेदवार हरले. आ.रवींद्र वायकर यांनी ऐनवेळी उद्धवसेनेतून शिंदेसेनेत उडी घेतली आणि मुंबई उत्तर-पश्चिममधून त्यांचा अटीतटीच्या लढतीत विजय झाला.  ‘गजांआड जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय उरले होते, जड अंत:करणानेच मी पक्ष बदलला’ असे विधान ऐन प्रचारकाळात वायकर यांनी केले होते.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिंदेसेनेत गेले पण लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करून शिरूरची उमेदवारी मिळविली मात्र ते पराभूत झाले. उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांची स्थिती ना इकडचे ना तिकडचे अशी झाली. आमदारकी सोडून ते शिंदेसेनेत गेले, रामटेकमधून लढले आणि पराभूत झाले. 

या नेत्यांचे पक्षांतरही निष्फळमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले पण नांदेडमध्ये भाजपचा पराभव झाला. माजी मंत्री बसवराज पाटील हेही काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले पण त्यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते अशा लातूर आणि उस्मानाबादमध्ये महायुतीचा पराभव झाला. मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेने काँग्रेसमधून येताच राज्यसभेवर पाठविले पण देवरांच्या दक्षिण मुंबईत शिंदेसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. माजी खा.संजय निरुपम हे शिंदेसेनेत गेले पण या पक्षाला मुंबईत एकही जागा मिळाली नाही. 

पक्ष बदलला, निवडणूक लढविली अन्...नवनीत राणा यांनी भाजपमध्ये जाऊन अमरावतीची जागा लढविली पण त्यांचा पराभव झाला. पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी अजित पवार गटाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश करत अहमदनगरची उमेदवारी मिळविली आणि डॉ.सुजय विखे पाटील यांचा पराभव केला.चाळीसगावचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी भाजप सोडून उद्धवसेनेकडून जळगावात लढले पण त्यांचा पराभव झाला. माजी आमदार अमर काळे यांना शरद पवार गटाने वर्धेतून उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. भाजपमध्ये असलेले धैर्यशील मोहिते शरद पवार गटात गेले आणि त्यांनी दणक्यात विजय मिळविला. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी