शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी ‘वर्षा’ बंगल्यावर रात्रीचा दिवस!, शिंदे-फडणवीसांमध्ये साडेतीन तास खलबते, ठरले काय ते कळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 07:05 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी मध्यरात्री ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक झाली.

 मुंबई - महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी मध्यरात्री ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक झाली. बारामतीचा तिढा सुटल्यानंतर आता नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग तसेच अन्य मतदारसंघांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेतीन तास बैठक पार पडली. काय ठरले की ठरले नाही, हे गुलदस्त्यातच आहे.

या बैठकीत ठाणे, कल्याण, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या चारही मतदारसंघांबाबत शिंदेसेना आग्रही असून, नेमका काय तोडगा काढता येईल, याची चाचपणी या बैठकीत झाली. यावेळी कल्याण मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे हेही उपस्थित होते. 

- भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गट हे तिघेही नाशिकसाठी दावेदार आहेत. भाजपचा उमेदवार कोण असेल, हेही स्पष्ट नाही, तर अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांचे नाव पुढे आले आहे. शिंदेसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबईत दोनदा शक्तिप्रदर्शन केले. शुक्रवारी गोडसे यांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून आल्यानंतर हनुमानाला साकडे घातले.

‘वंचित’च्या दुसऱ्या यादीत ११ उमेदवारवंचित बहुजन आघाडीने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यानंतर वंचितच्या उमेदवारांची संख्या १९ वर पोहोचली आहे. दुसऱ्या यादीतील उमेदवार : हिंगोली : बी. बी. चव्हाण, लातूर : नरसिंहराव उदगीरकर, सोलापूर : राहुल गायकवाड, माढा : रमेश नागनाथ बारसकर, सातारा : मारूती जानकर, धुळे : अब्दुल रहेमान, हातकणंगले : दादासाहेब उर्फ दादागौडा चवगोंडा पाटील, रावेर : संजय पंडित ब्राम्हणे, जालना : प्रभाकर देवमन बकले, मुंबई उत्तर-मध्य : अबुल हसन खान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग : काका जोशी.

वंचित सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार आहे. मात्र, त्या बदल्यात काँग्रेसला अकोल्यासाठी समर्थन मागणार नाही. एमआयएमसोबत न जाण्याचा पक्षाचा निर्णय होता. तो मी त्यांना कळविला आहे.    - ॲड. प्रकाश आंबेडकर

टॅग्स :MahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४