शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 16:10 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: कोल्हापूरच्या सभेवरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) बोचरी टीका केली होती. त्या टीकेला आता भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज कोल्हापुरात होत असलेल्या प्रचारसभेवरून आज महायुती आणि महाविकसा आघाडीच्या नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली आहे. त्यात ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधात प्रचारासाठी कोल्हापुरात आले होते हे महाराष्ट्राची जनता  कधीच विसरणार नाही, भाजपा छत्रपतींच्या गादीचा अपमान करत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्या टीकेला आता भाजपा नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापूरचा निकष लावत असाल तर साताऱ्यामध्ये उदयनराजेंविरोधात महाविकास आघाडीचे नेते प्रचार का करत आहेत, असा सवाल नितेश राणे यांची विचारला आहे. 

संजय राऊत यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, कोल्हापूरचा निकष लावत असाल तर महाविकास आघाडीचे नेते साताऱ्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविरोधात का प्रचार करत आहेत. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, हा संजय राऊतांचा खोटा गुण आहे. याच संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागितले होते. त्या कृतीसाठी संजय राऊत यांनी आधी माफी मागितली पाहिजे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापुरात होत असलेल्या सभेबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले होते की, ज्या शाहू महाराजांनी राज्य आणि देशाला पुरोगामी विचार दिला. जे शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी येताहेत हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही. छत्रपती शाहू आणि त्यांच्याआधीचे सगळे या गादीचे वारसदार यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान आहे. त्यामुळे भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांनी कोल्हापूरमधून उमेदवार उभं करणंच चूक आहे. छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावं आणि महाराष्ट्रातील शाहू, फुले, आंबेडकरांच्या परंपरेचा सन्मान करावा, अशी आमची इच्छा होती. कोल्हापूरची जागा शिवसेनेची होती. तरी आम्ही शाहू महाराज निवडणुकीला उभे राहताहेत हे ऐकल्यावर ती जागा त्यांच्यासाठी सोडली. पण भाजपाकडून नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी येताहेत. नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधात प्रचारासाठी कोल्हापुरात आले होते हे महाराष्ट्राची जनता  कधीच विसरणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४kolhapur-pcकोल्हापूरNitesh Raneनीतेश राणे Sanjay Rautसंजय राऊतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी