मुंबई : भाजपने माढ्यातून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने नाराज असलेल्या अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी बुधवारी रात्री उशीरा मुंबईत शरद पवारांची भेट घेतली. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या या भेटीत धैर्यशील यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे समजते. धैर्यशील यांचा शरद पवार गटात प्रवेश झाल्यास ते माढ्यातून तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, असे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीत माढा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाट्याला आला आहे. शरद पवार गटाने अद्याप तेथील उमेदवार जाहीर केलेला नसून उमेदवारांसाठी चाचपणी सुरू आहे. तर माढ्यातून निवडणूक लढविण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक आहेत.
धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 09:45 IST